शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यासाठी जिल्हास्तरीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST

अमरावती : पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात अनेक गावांतील वाड्या, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक आहेत. त्यामुळे राज्यासाठी ही बाब भूषणावह ...

अमरावती : पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात अनेक गावांतील वाड्या, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक आहेत. त्यामुळे राज्यासाठी ही बाब भूषणावह नाही. गावागावात सलोख्याचे संबंध, तसेच सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यासाठी अशा गाव, वाड्या, वस्त्यांची नावे बदलून त्या ठिकाणी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामविकास व सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या शासननिर्णयानुसार जिल्हास्तरावर समिती गठित केली आहे.

या समितीमध्ये राज्यस्तरीय, विभागीय, तसेच जिल्हास्तरावर समितीचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये सदस्य म्हणून महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात येणार आहे. ही समिती गाव स्तरावरील जातीवाचक वाड्या, वस्त्या, रस्त्यांची नावे बदलण्यासाठी प्रयत्न करणार असून, त्यासंदभार्तील अहवाल शासनाला पाठविणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अशा वाड्या, वस्त्यांची नावे लवकरच बदलणार असून, गावागावात एकात्मतेची, तसेच सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गावात सलोखा निर्माण होणार आहे.

बॉक्स

महापुरुषांची देणार नावे

जिल्ह्यातील काही वॉर्ड, तसेच वस्त्यांना जातीवाचक नावे असतील त्यावर त्यांचे नाव बदलून आता त्यावर त्यांना महापुरुषाचे नाव देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर नागरिकांनी सुचविलेल्या नावांचाही विचार केला जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने आता पुढाकार घेतला असून, राज्यातील जिल्हा पातळीवर समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील जातीवाचक वाड्या, वस्त्यांची नावे बदलवून नवीन नावे दिली जाणार आहेत.