शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षाचालकांना लागतेय शिस्त

By admin | Updated: September 29, 2015 01:52 IST

नव्या वस्तीकडून शिस्तीत प्रवासी घेण्याचे आदेश १५ दिवसांपासून नव्याने रूजू झालेले रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस

बडनेरा : नव्या वस्तीकडून शिस्तीत प्रवासी घेण्याचे आदेश १५ दिवसांपासून नव्याने रूजू झालेले रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस निरीक्षकांनी आॅटोचालकांना दिले आहे. सध्या आॅटो पार्किंगमधूनच प्रवासी घेतले जात आहेत. यामुळे प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून बडनेऱ्याच्या रेल्वेस्थानक परिसरात पार्किंग झोन उभारण्यात आले आहे. मात्र आॅटोचालक नियमाने प्रवासी बसवित नसल्यामुळे प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये वृत्तदेखील प्रकाशित झालेले आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांनी अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत. मात्र प्रशासनाने याची कधीच दखल घेतलेली नाही. दोन महिन्यांपूर्वी भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांनी रेल्वेस्थानक परिसरातील विस्कळीत आॅटो थांब्याला शिस्त लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. काही दिवस नीटनेटके चालणाऱ्या आॅटोचालकांनी मात्र त्यात नियमितता ठेवली नाही. नव्याने बडनेऱ्यातील रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात सी.एस. पटेल हे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी सर्वप्रथम आॅटो शिस्तीत चालले पाहिजे. हा उपक्रम हाती घेतला आहे. तब्बल १५ दिवसांपासून आॅटोचालक शिस्तीने प्रवासी बसवित आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे सुरक्षा बलाने आॅटो चालकांना आॅटो पार्किंग लेनमध्येच उभे करण्याचे व एकएक आॅटो सोडून प्रवासी बसविण्याची जी शिस्त घालून दिली आहे, ती नेहमीसाठीच सुरू रहावी, अन्यथा यापूर्वीदेखील याचप्रमाणे प्रयत्न करण्यात आले. मात्र ते फार दिवस टिकू शकले नाही. रेल्वे प्रशासनाने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांचा गोंधळ उडत नाही. इतर वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण होत नसल्याचे चित्र याठिकाणी आहे. त्यामुळे प्रवासी वर्ग सुखावला आहे. आता ही शिस्त कायमस्वरुपी राहावी, अशी अपेक्षा आहे.इतरही वाहनांना नियम घालून द्यावेरेल्वे स्थानक परिसरातून आॅटो, मिनीडोअर व शहर बसेस चालतात. सध्या आॅटोचालकांना पार्किंग झोनमध्येच उभे राहून प्रवासी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच मिनीडोअर व शहर बसचालकांनादेखील कायदेशीररीत्या प्रवासी घेण्याची शिस्त लावण्यात यावी. ज्यामुळे बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात अनेक वर्षांपासून प्रवाशांना डोकेदुखी ठरणारा विस्कळीत वाहतुकीचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागेल. खासगी प्रवासी गाड्यांची धुडगूस आॅटोचालकांना नियमाने प्रवासी घेण्याचा नियम लावून देण्यात आला आहे. आॅटोचालक दिलेल्या नियमाने सध्यातरी प्रवासी आॅटोमध्ये बसवीत आहेत. मात्र काळी-पिवळी व खासगी प्रवासी वाहनचालक राजरोसपणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातूनच प्रवासी बसवीत आहेत, हे नियबाह्य आहे. याकडे रेल्वे सुरक्षा बलाचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक लक्ष देतील काय, असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. आॅटो युनियनने केली 'कॉन्स्टेबल'ची मागणीबडनेरा आॅटो युनियनने या उपक्रमाचे स्वागतच केले आहे. पार्किंगमधून आॅटो सोडण्याचा उपक्रम जेवढा प्रवासी वर्गांसाठी चांगला आहे, तेवढाच आॅटो चालकांनादेखील पार्किंगमध्ये आॅटो लावण्यास सोयीचे आहे. मात्र काही आॅटो रेल्वेस्थानक परिसरात इतरत्र फिरुन प्रवासी बसवित आहेत, असे व्हायला नको. ज्यामुळे शिस्तीत चालणाऱ्या आॅटोचालकांना प्रवासी मिळणार नाही. नियम सर्वांसाठी सारखाच असावा. आॅटो पार्किंगमध्ये तसेच शिस्तीतच लावावे, यासाठी बडनेरा आॅटो युनियनने पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन येथे पूर्णवेळ दोन कॉन्स्टेबल तैनात करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे लावून दिलेली शिस्त टिकून राहील, असे म्हणणे आहे.