शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी दबावतंत्राचा वापर केल्यास शिस्तभंगाची कारवाई

By admin | Updated: May 15, 2015 00:05 IST

राज्य शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एप्रिल मे मध्ये प्रारंभ होत असतो.

अमरावती : राज्य शासनाच्या विविध विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एप्रिल मे मध्ये प्रारंभ होत असतो. त्यामुळे बदल्यांच्या काळात मोजक्याच जागी अथवा चांगले पद मिळविण्यासाठी आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधींकडून वशिला दबाव आणण्याचेही प्रमाण अधिक असते. मात्र दबाव तंत्राचा वापर केल्यास कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या विरोधात आश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी व बदल्यांची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नवीन शासनाने बदली कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे ठरविले आहे. मध्यावधी बदल्या करताना या कायद्यातील तरतुदीचे पालन करण्याच्या सूचना आणि आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यात म्हटले आहे की, तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय कर्मचाऱ्यांची अथवा अधिकाऱ्यांची बदली करु नये. शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या एप्रिल - मे मध्ये केल्या जाव्यात. एखाद्या प्रकरणात ३ वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गैरवर्तणुकीची तक्रार असल्यास आणि त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला त्याच पदावर ठेवून त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच त्या कर्मचाऱ्यांची बदली करायची की नाही, पुरावे झाल्याशिवाय शिफारस करता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आले आहेत. गैरप्रकारांना आळा बसणारएखाद्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तणुकीचा आरोप अथवा कारवाई प्रस्तावित झाल्यास त्या कर्मचाऱ्याला त्याच पदावर ठेवून शिस्तभंगाची कारवाई करावी. मात्र त्या कर्मचाऱ्याला पदावर ठेवणे योग्य नाही, असे आढळून आले तर त्याची योग्य अशी कारणमीमांसा देत त्यांच्या बदलीची शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करावी. स्वत:च्या सोयीसाठी अनेक कर्मचारी बदली करुन घेतात. अशा आहेत मार्गदर्शक सूचनावर्षातून केवळ एप्रिल, मे महिन्यातच बदल्या कराव्यात. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय बदली प्रस्तावित करु नये. कोणत्याही संवर्गासाठी धोरण सारखेच ठेवावे. तीन वर्षांच्या आधीच कर्मचाऱ्यांची बदली करायची झाल्यास त्यासाठी योग्य कारणे सादर करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहमती घ्यावी. दबावतंत्राचा वापर केल्यास आवश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करावी. बदली कायद्याचे काटेकोर पालन करावे.