शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतून अनुदान निधी काढण्यास अडचणी

By admin | Updated: May 10, 2014 23:58 IST

गारपीटग्रस्तांची यादी तयार करीत असताना त्रुटी राहिल्यामुळे बँकेमधून रक्कम काढण्यासाठी शेतकर्‍यांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहे.

अमरावती : गारपीटग्रस्तांची यादी तयार करीत असताना त्रुटी राहिल्यामुळे बँकेमधून रक्कम काढण्यासाठी शेतकर्‍यांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात पाऊस व गारपीट यामुळे जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रचलित मदतीच्या निकषापेक्षा अधिक मदतीचे पॅकेज शासनाने दिले. महसूल व कृषी विभागाचे संयुक्त सर्वेक्षण होऊन ५० टक्क्यांवर अधिक शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये काही शेतकर्‍यांची नावे चुकली तर काही शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक चुकीचा लिहिण्यात आला. त्यामुळे शेतकर्‍यांना बँकेतून मदतनिधीची रक्कम काढताना नाहक हेलपाटे मारावे लागत आहे. शेतकर्‍यांना समजावून सांगताना बँक कर्मचार्‍यांच्या नाकीनऊ आले आहे. खरीप हंगाम महिन्याभरावर आला आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे, खते यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. अशा वेळी अनुदान निधीमुळे शेतकर्‍यांची आर्थिक अडचण काही प्रमाणात दूर होऊ शकते. परंतु महसूल कर्मचार्‍यांनी तयार केलेल्या सदोष याद्यामुळे अनेक शेतकर्‍यांना रक्कम मिळू शकली नाही. यादीमधील त्रूटी दूर करण्यासाठी शेतकर्‍यांना पुन्हा तहसील कार्यालयात जावे लागत आहे व त्रुटी दुरूस्तीचे पत्र पुन्हा बँकेत न्यावे लागत आहे. त्यानंतर त्यांना अनुदान निधी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. शेतकरी मदतीपासून वंचित राहत असल्याविषयी अनेक तक्रारी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आल्या आहेत. हा त्रास कमी व्हावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)