रिद्धपूरमधील विकासकामे कूर्मगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:06 IST2021-01-24T04:06:30+5:302021-01-24T04:06:30+5:30

फोटो पी २३ रिद्धपूर फोल्डर मोर्शी : पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील रखडलेल्या विकासकामांना त्वरित सुरुवात करण्यात ...

Development work in Ridhpur is in full swing | रिद्धपूरमधील विकासकामे कूर्मगतीने

रिद्धपूरमधील विकासकामे कूर्मगतीने

फोटो पी २३ रिद्धपूर फोल्डर

मोर्शी : पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील रखडलेल्या विकासकामांना त्वरित सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महानुभावपंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिद्धपूर तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा शासनस्तरावर मंजूर करण्यात आला. कामेदेखील सुरू करण्यात आली. मात्र, ती कामे संथ गतीने सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी रिद्धपूर गाठून विकासकामांची पाहणी केली. त्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेने आता कामाचा वेग वाढवावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. तेथील मुख्य रस्ते व मंदिराच्या ग्रामपंचायतच्या खुल्या जागांचे सर्वेक्षण अद्यापही करण्यात आलेले नाही, शिवाय थीम पार्क उद्यानाचे कामसुद्धा धीम्या गतीने सुरू आहे. पुढील १५ दिवसांत राज्य शासनाच्यावतीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा भारतीय जनता पक्षाचे दक्षता समिती अध्यक्ष प्रमोद हरणे यांनी रिद्धपूर येथील संत महंतांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

---------------------

Web Title: Development work in Ridhpur is in full swing