शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हा कचेरीसमोर निदर्शने

By admin | Updated: June 25, 2014 23:33 IST

महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या व संवर्गाची पदस्थापना देताना कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही.

अमरावती : महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या व संवर्गाची पदस्थापना देताना कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही. बुधवारी विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रशासकीय बदल्या, पुरवठा निरीक्षक, करमणूक कर निरीक्षक या बदल्यांमुळे अन्याय झाला आहे. अव्वल कारकून संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पदस्थापनेत हाच प्रकार झाल्याचा संघटनेचा आरोप आहे. आपसी बदली तसेच विनंती बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. याउलट निवासी उपजिल्हाकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेने केला आहे. अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील गैरसोईच्या झालेल्या बदल्या कर्मचाऱ्यांच्या व प्रशासनाचे सोईने करणे, पुरवठा निरीक्षक, करमणूक कर निरीक्षक व प्रशासकीय बदल्यांमध्ये झालेला अन्याय दूर करणे, खनिकर्म निरीक्षकाचे पद प्रचलीत पद्धतीनुसार सेवाजेष्ठतेने भरणे, कर्मचाऱ्यांची पदोन्नती, कालबद्ध पदोन्नतीमध्ये दुरूस्ती करणे, कर्मचाऱ्यांच्या सेवाजेष्ठता याद्या प्रसिद्ध करणे यासह अन्य मागण्या संघटनेद्वारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केले आहे. मागण्या मान्य न झाल्यामुळे बुधवारी महसूल जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने केली. या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सैय्यद अफझल, कार्याध्यक्ष के. एस. रघुवंशी, सरचिटणीस नामदेव गडलिकंग, क्रिडा सचिव सुशील पवार व जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)