शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने

By admin | Updated: September 20, 2015 00:38 IST

शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे निकष विहीत करणारा २८ आॅगस्ट २०१५ चा शासन निर्णय रद्द करावा ...

आंदोलन : विदर्भ माध्यमिक संघाचे निवेदनअमरावती : शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे निकष विहीत करणारा २८ आॅगस्ट २०१५ चा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यासाठी शनिवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने व धरणे करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.आंदोलन कर्त्याच्या प्रमुख मागण्यामध्ये बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषगांने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरू कराव्यात, वर्ग जोडणीबाबत नव्याने निर्गमित केलेल्या २८ आॅगस्टच्या शासन निर्णयाने शिक्षण विभागातील सर्व घटकांवर अन्याय होणार आहे.याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर अधिक प्रमाणात विपरित परिणाम करण्याची योजना शासनाने घेतल्याचा आरोप विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केला असून हा शासन जनर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा, याबाबत विमाशि संघाचे सरकार्यावाहकमाजी आमदार व्ही.यु डायगव्हाणे यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी लेखी पत्रव्यवहार केला आहे. मात्र यावर कुठलाही निर्णय घेण्यात न आल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी विमाशि संघाने निदर्शने करून शासकन व प्रशासनाचे लक्ष वेधून शिक्षण उपसंचालक सोनवणे यांना मागणीचे निवेदन सोपविले आहे. यावेळीे आंदोलनात विमाशिपचे प्रातीय अध्यक्ष एस.जी बरडे, अतुल देशमुख, रामदास बारोटे,विलास हरणे, अरविंद चौधरी दशरथ रसे, जयंत सराटकर, नि,ेश दातीर, अकील अहमद, गजेंद्र शेंडे, गजानन बुरघाटे, विजय वडतकर, अमर घोरपडे, आशिष डेहनकर, महेश निर्मळ, अविनाश जयस्वाल, पांडूरंग चुळे, दिपक चवरे, गणेश सानप, राजेंद्र भस्मे, बन्सीलाल प्रजापती, तिडके आदीसह मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)