शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एसटी वाहकाकडून प्रवाशांची अवहेलना

By admin | Updated: September 21, 2015 00:01 IST

अमरावतीहून चिखलदरा-यवतमाळ बस क्रमांक एमएच ४० वाय ५५६२ या बसमध्ये चढलेल्या प्रवासी महिलेला नांदगाव खंडेश्वर येथे उतरविण्याचा प्रयत्न केल्याने ...

शिवणी रसुलापूर : अमरावतीहून चिखलदरा-यवतमाळ बस क्रमांक एमएच ४० वाय ५५६२ या बसमध्ये चढलेल्या प्रवासी महिलेला नांदगाव खंडेश्वर येथे उतरविण्याचा प्रयत्न केल्याने शिवणी बस थांब्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जलद बसेसना थांबा असूनही वाहकांच्या मनमानी कारभारामुळे बसेस थांबत नसल्याने गेल्या १६ सप्टेंबर रोजी शिवणी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही जलद बसेस थांबत नसल्याने संतप्त नागरिकांनी पुन्हा रविवारी रस्त्यावर येऊन ठिय्या दिला. शिवणी रसुलापूर येथे येणाऱ्या मुक्ता उमेश बनसोड या महिलेने सदर बसच्या वाहकाला शिवणीचे तिकीट मागितले असता त्याने शिवणीला बस थांबत नसल्याचे सांगितले व नांदगाव खंडेश्वरचे तिकीट दिले. सदर महिलेने याबाबत माहिती घेतल्यानंतर वाहकाकडे शिवणीचे तिकीट मागितले. नांदगाव खंडेश्वर येथे बस पोहोचल्यानंतर त्याने नांदगाव खंडेश्वर ते शिवणी असे तिकीट दिले. सदर महिलेने ही माहिती नातेवाईकाला दिली. ही बस थांब्यापासून दूर उभी करण्यात आली होती. त्यामुळे थांब्यावरील संतप्त प्रवाशांनी बस अडविली. थांब्यावरील प्रवासी व नागरिकांनी नेर आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण केले व लेखी तक्रार दिली. १६ सप्टेंबर रोजी अशाच प्रकरणी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर येथे पूर्ण वेळ वाहतूक नियंत्रक देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही काही जलद बसेस येथे थांबत नाहीत. एसटीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर असतानाही काही बसेस थांबत नव्हत्या. त्यामुळे प्रवासी हतबल झाले होते. बस थांबावी यासाठी उमेश बनसोड, ज्ञानेश्वर कळंबे, माधव ढोके, धीरज बनकर, मोरेश्वर वंजारी व गावकऱ्यांनी रविवारी सदर बस रोखून मन:स्ताप व्यक्त केला. याची दखल घेत नेर आगाराचे व्यवस्थापक व अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली.