शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

दीप कॉलनीवासी पितात पडीक विहिरीचे पाणी

By admin | Updated: May 19, 2015 00:14 IST

दीप कॉलनी परिसरातील नागरिक अजूनही अशुद्ध विहिरीतील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करीत आहेत.

मोर्शीत आरोग्य धोक्यात : नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्षमोर्शी : दीप कॉलनी परिसरातील नागरिक अजूनही अशुद्ध विहिरीतील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करीत आहेत. या परिसरात अजूनही पथदिवे नाहीत, रस्ते नाहीत, नगर परिषदेचे या भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करीत आहेत. दीप कॉलनी परिसरालगत असलेल्या नवीन वसाहतीत अजूनही नगरपरिषदेने जलवाहनी टाकलेली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नळाचे पाणी उपलब्ध होत नाही. या वसाहतीत शेतातील जुनी पडीक विहीर आहे, विहिरीच्या चहूबाजूंनी वनस्पती आणि झाडेझुडुपे वाढलेली आहेत. त्याचा कचरा विहिरीत पडतो; तथापि विहिरीला पुरेसे पाणी नसल्यामुळे आणि नप व्दारे कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे शेवटी या परिसरातील नागरिकांनी या विहिरीवर आपआपल्या मोटारी बसविल्या आणि या विहीरीच्या अशुध्द आणि अस्वच्छ पाण्याचा उपयोग ते वापरण्याकरिता आणि पिण्यासाठीही करीत आहेत. पथदिवे आणि रस्तेही नाही या परिसरात अजूनही नगर परिषदेने पथदिवे बसविलेले नाहीत, रस्ता आणि नाल्याही नाहीत. कच्च्या खोदलेल्या नाल्यामधून सांडपाणी, शौचालयाचे पाणी खोेलगट भागात जमा होते. पावसाळ्यात पाणी थेट ज्या विहिरीचे पाणी नागरिक पीत आहेत, तेथपर्यंत पोहोचते. दूषित पाणी या विहिरीत जमा होते. आता टंचाईच्या काळात हे दूषित पाणी नागरिकांना पिण्याची वेळ आली आहे. गावालत जंगलसदृश परिसर आहे. यापरिसरात नेहमीच सरपटणारे प्राणी फिरतात. पथदिव्याअभावी परिसरात अंधार राहतो. त्यामुळे कच्या रस्त्यावरुन ये-जा करणे धोक्याचे झाले आहे. डांबरी रस्ते निर्माण व्हावे, पिण्याचे पाणी नळाव्दारे पुरविण्यात यावे आणि पथदिवे लावून मिळावे यासंदर्भात अनेकवेळा पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली. मात्र हीच परिस्थिती मागील अनेक वर्षांपासून कायम असल्याची संतप्त भावना या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)मुख्याधिकारी ठाकरे यांच्याकडून अपेक्षा कर्तव्यदक्ष आणि सामान्यांच्या पीडा जाणणाऱ्या म्हणून नावलौकिक असलेल्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्याकडून या परिसरातील नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्या आमच्या समस्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सोडवतील, अशी आशा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.