माधान येथे शवपेटीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:10 IST2021-07-01T04:10:25+5:302021-07-01T04:10:25+5:30

माधान येथील भूमिपुत्र तर्फे भेट फोटो - ३० चांदूर बाजार चांदूर बाजार - तालुक्यातील माधान येथील प्रबुद्ध बहुउद्देशीय मंडळद्वारे ...

Dedication of coffin at Madhan | माधान येथे शवपेटीचे लोकार्पण

माधान येथे शवपेटीचे लोकार्पण

माधान येथील भूमिपुत्र तर्फे भेट

फोटो - ३० चांदूर बाजार

चांदूर बाजार - तालुक्यातील माधान येथील प्रबुद्ध बहुउद्देशीय मंडळद्वारे आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून ॉशवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

माधानचे भूमिपुत्र तथा नागपूरच्या जीवन आधार केंद्राचे संचालक जीवन जवंजाळ यांनी त्यांचे आजी-आजोबा सुंदराबाई व तुळशीराम जवंजाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही शवपेटी भेट दिली. नागपूरचे शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी शाहू महाराजांवर गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले तसेच मातंग समाजातील पंचक्रोशीतील एकमेव पदव्युत्तर ऋषीकेश वानखडे यांचा सुधीर सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच अंजली मोहोड, उपसरपंच अभिजित जवंजाळ, बाबूराव जवंजाळ, कोल्हे गुरुजी, वामनराव मोहोड, रमेशपंत जवंजाळ, जानराव पाटेकर, नंदू देशमुख, पंकज आवारे, किशोर पटवर्धन, अशोक गजभिये, रूपराव खंडारे, मंडळाचे कार्यकर्ते विजू खांडेकर, संजू उके, रोशन पगारे, धीरज उके, प्रकाश हिरेकर, सतीश मंडळे, अतुल भिमटे, मयूर मेश्राम, देवानंद खंडारे, आशिष मेश्राम, भूषण रामटेके, सतीश वाघमारे, रोहित मेश्राम, मृत्युंजय आवारे, रोहित जवंजाळ तसेच अलीपूर-माधान येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माधुरी कडुकार यांनी केले.

Web Title: Dedication of coffin at Madhan