शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारीचे विकेंद्रीकरण, स्वयंसेवकही सज्ज

By admin | Updated: September 14, 2016 00:08 IST

कोपर्डी येथील नृशंस घटनेचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाची मागणी बुलंद करण्यासाठी...

मराठा क्रांती मोर्चा : नियोजन बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसादअमरावती : कोपर्डी येथील नृशंस घटनेचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाची मागणी बुलंद करण्यासाठी २२ सप्टेंबरला मराठा समाजबांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. मोर्चाचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी मंगळवारी येथील एका मंगल कार्यालयामध्ये तिसरी नियोजन बैठक घेण्यात आली. याबैठकीत मराठा समाजातील प्राध्यापक, अधिकारी, शिक्षक, डॉक्टर्स, वकील आणि नोकरदार मराठ्यांचा सहभाग होता. या बैठकीत प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली. तथा या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले.मोर्चाची व्यापकता लक्षात घेता आर्थिक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, रूग्णवाहिका, झेंडे, लाऊडस्पिकर, स्क्रीन, वाहने, युरिनल याबाबतही सूचना मागविण्यात आल्या आहेत. शिक्षक, एसटी महामंडळातील कर्मचारी आणि उपस्थित सर्वांनी सूचना केल्यात. या मोर्चात तरुण, महिला, उद्योजक, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक, कामगार, सामाजिक राजकीय कार्यकर्ते सहभागी होतील.तिवसा तालुक्यातूनही हजारोंचा सहभाग तिवसा : कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ २२ सप्टेंबर रोजी अमरावती येथे निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची नियोजन बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी मोठ्या संखेने मराठा समाजबांधव उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाच्या सर्वपक्षीय आणि सर्व संघटनांच्या प्रमुखांनी उपस्थित राहून नियोजनावर चर्चा केली. गावपातळीवर जबाबदाऱ्यांचे वितरणही करण्यात आले. मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी एक कोर कमेटी नेमण्यात आली. सदर मोर्चा कोणत्याही जातिविरुद्ध नसून चुकीची व्यवस्था आणि कायद्याचा दुरपयोग करणाऱ्यांविरोधात आहे, असे यावेळी उपस्थितांनी सांगितले. परतवाड्यातून सहभागी होणार हजारो मराठा परतवाडा : २२ सप्टेंबर रोजीच्या मराठा समाजाच्या मूकमोर्चाच्या अनुषंगाने १३ सप्टेंबर रोजी अचलपूर बाजार समितीच्या सभागृहात नियोजन बैठक घेण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या बैठकीला अचलपूर-परतवाडासह ग्रामीण भागातील हजारो मराठा समाजबांधव उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी या मोर्चात सहभागी होण्याचे निश्चय केले. वाहन व्यवस्था, पाणी व्यवस्था व गावागावांतील मराठ्यांनी मोर्चाबाबत माहिती पोहोचविण्याची जबाबदारी आदींचे नियोजन बैठकीत केले. सभागृहात अनेकांनी लाखोंच्या देणग्या घोषित केल्या तर काहींनी दानपेटीत आपला संकल्प दान केला. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झालीत. (प्रतिनिधी)तालुक्यातील मराठ्यांकडून व्यापक प्रतिसादअंजनगाव सुर्जी : मराठा समाजाच्या २२ सप्टेंबरला आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनाकरिता सोमवारी येथील एका मंगल कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या मोर्चाची संपूर्ण जबाबदारी तरुणांनी त्यांच्या खांद्यावर घेतली असून त्याकरिता सर्कलनुसार वेगवेगळे गट तयार केले आहेत. या मोर्चा करीता अंजनगाव तालुक्यातून चाळीस हजार मराठे सहभागी होणार आहेत. पीडित मुलीला न्याय द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात शिथिलता आणावी, मराठा आरक्षण अशा विविध मागण्यांसाठी प्रथमच एकवटतो आहे. या मोर्चात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, व्यापारी, नोकरदार, वकील, शिक्षक असे सर्व लोक सहभागी होणार आहेत.