मरणाच्या दारी सेवेचे तोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:00:22+5:30

वेल्डिंग व्यावसायिक अरुण चांदूरकर यांच्याकडे अनिकेत नामक मुलगा कामावर होता. त्याचे वडील डिसेंबर २०१७ रोजी मृत्यू पावले. परिस्थिती अतिशय नाजूक. अंत्यविधी करायला कुणीही जबाबदार घरी नव्हते. अनिकेत लहान होता. याचवेळी त्यांच्या अंत्यक्रियेकरिता लागणारी पूर्ण व्यवस्था आपण करावी, असे चांदूरकरांना वाटले. त्यांनी ती सर्व व्यवस्था केली.

Death Gate Service Pylon | मरणाच्या दारी सेवेचे तोरण

मरणाच्या दारी सेवेचे तोरण

ठळक मुद्देनि:शुल्क साहित्य : तीन वर्षांत २५२ मरणघरी सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : मरणघरी घरासमोरील मंडपासून ते स्मशानातील अंत्यविधीपर्यंत अंजनसिंगी येथील अरुण चांदूरकर तीन वर्षांपासून मोफत सेवा देत आहेत.
वेल्डिंग व्यावसायिक अरुण चांदूरकर यांच्याकडे अनिकेत नामक मुलगा कामावर होता. त्याचे वडील डिसेंबर २०१७ रोजी मृत्यू पावले. परिस्थिती अतिशय नाजूक. अंत्यविधी करायला कुणीही जबाबदार घरी नव्हते. अनिकेत लहान होता. याचवेळी त्यांच्या अंत्यक्रियेकरिता लागणारी पूर्ण व्यवस्था आपण करावी, असे चांदूरकरांना वाटले. त्यांनी ती सर्व व्यवस्था केली. तेव्हापासून गरजुंना ही सेवा कायमस्वरूपी त्यांनी सुरू केली. तीन वर्षात २५२ मरणघरी त्यांची मदत झाली. जात, पात, धर्म, पंथ या बाबी आड न येऊ देता त्यांनी ढाकुलगाव, पिंपळखुटा, धारवाडा, दुर्गवाडा, बोर्डा, अंजनसिंगी या गावांमध्ये सेवा दिली आहे.
३० बाय १५ फुटांचा मंडप, पाण्याच्या कॅन, साहित्य नेण्याकरिता रिक्षा, पाहुण्यांना बसण्याकरिता मोठी सतरंजी, अंत्यक्रियेसाठी लागणारी शिडी हे साहित्य मृत्युघरी विनामूल्य उपलब्ध करून येत आहेत. समाजात अनेक प्रकारची सेवाकार्ये चालतात. माझ्या सेवाकार्याने इतरांना सेवेची प्रेरणा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा अरुण चांदूरकर यांनी व्यक्त केली. चांदूरकर यांचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Web Title: Death Gate Service Pylon