शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडून बाप-लेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 16:03 IST

सुटीचा दिवस असल्याने बकऱ्या चारायला गेलेल्या चिमुकल्यासह त्याच्या वडिलांचा तलावात बुडून मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमतधामणगाव रेल्वे, दि. 2 - सुटीचा दिवस असल्याने बकऱ्या चारायला गेलेल्या चिमुकल्यासह त्याच्या वडिलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गावात सोमवारी एकही चूल पेटली नाही़सुधाकर गोविंद ठोकळे (४२) व दर्शन सुधाकर ठोकळे (८) अशी मृतांची नावे आहेत. सुधाकर यांनी रविवारी घरच्या बकऱ्या शेतात चारण्यासाठी नेल्या होत्या. रविवारी सुटी असल्याने त्यांचा आठ वर्षांचा मुलगा दर्शन देखील स्वत:ची सायकल घेऊन वडिलांसोबत शेतात गेला. सायंकाळी बकऱ्या पाणी पिण्यासाठी गावाशेजारी असलेल्या साठवण तलावावर गेल्यात. बकरी तलावात पडू नये म्हणून तिला हाकण्यासाठी चिमुकला दर्शनही मागोमाग गेला. परंतु पाय घसरून तो तलावात पडला. चिमुकल्याचा आवाज ऐकताच वडील सुधाकर त्याला वाचविण्यासाठी गेले असता दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला़सायंकाळ होऊनही बाप-लेक घरी न परतल्याने संपूर्ण गाव त्यांच्या शोधात निघाले. खूप शोध घेतला असता गावानजीकच्या तलावाजवळ चिमुकल्या दर्शनची सायकल व वडील सुधाकर यांची चप्पल आणि विळा आढळून आला. पोलिसांनी उशिरा रात्री तलावाच्या गाळात अडकलेले दोघांचे मृतदेह बाहेर काढले. सोमवारी सकाळी ग्रामीण रूग्णालयात बाप-लेकाच्या मृतदेहांचे विच्छेदन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर दाभाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ बाप-लेकांच्या या दुर्देवी मृत्युमुळे गावात सोमवारी शोकाकूल वातावरण होते. एकाही घरात चूल पेटली नाही़ मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र होटे, त्र्यबंक काळे अधिक तपास करीत आहेत. चिमुकला दर्शन हा धामणगाव येथील रावसाहेब रोंघे मेमोरीयल इंग्लिश स्कूल येथे दुसऱ्या वर्गात शिकत होता. सोमवारी श्रद्धांजली वाहून शाळेला सुटी देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)