शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

बहरावरील सोयाबीनला पावसाची गरज

By admin | Updated: September 7, 2016 00:17 IST

जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ४० टक्के असणारे सोयाबीन पीक फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.

नवे संकट : एक महिन्यापासून पावसात खंड, शेतकरी चिंताग्रस्त अमरावती : जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ४० टक्के असणारे सोयाबीन पीक फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या स्थितीमध्ये सोयाबीनला पावसाची नितांत आवश्यकता असताना एक महिन्यापासून पावसात खंड पडला आहे. याचा थेट परिणाम उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे एका पावसाने पीक हातचे जाणार का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक १२६.६ टक्के पाऊस पडला. सतत पोषक पाऊस असल्याने पिकांची वाढदेखील समाधानकारक आहे. सद्यस्थितीत सोयाबीन पीक बहरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. यावेळी सोयाबीनला पावसाची आवश्यकता असते. यामुळे शेंगामधील दाणे भरतात. पाऊस नसला तर शेंगादेखील पोचट होतात. यंदा अधिक पाऊस असल्याने चोपन व काळ्या जमिनीत आर्द्रता आहे. मात्र, मध्यम व हलक्या स्वरूपाच्या जमिनीतील पिकांना पावसाची आवश्यकता आहे. मात्र, जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून पावसात खंड आहे. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी पाण्याची पाळी देऊ शकतात. मात्र, जिरायती क्षेत्रात पावसाच्या ताणासाठी वेळीच व्यवस्थापन करण्याची गरज आहे. यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ८९ हजार २१२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ८९.५ टक्केवारी आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १५ हजार ४२० हेक्टर, अचलपूर १४ हजार ३०, चांदूरबाजार १६ हजार २००, धामणगाव १८ हजार २३, चांदूररेल्वे २७ हजार ३३५, तिवसा २२ हजार ९१४, मोर्शी १९ हजार ५७७, वरुड २ हजार ८०, दर्यापूर १४ हजार २४३, धारणी ९ हजार ९३०, चिखलदरा ११ हजार ५४३, अमरावती ३८ हजार ९६०, भातकुली २८ हजार ६७९ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५०,२७८ हेक्टरमध्ये सोयाबिनची पेरा आहे.चक्रभुंगा किडीसाठी उपाययोजना सोयाबीन पिकात फुलोरापूर्वी ३.५ वक्रभुंगा प्रतीलिटर ओळीत आढळल्याबरोबर प्रोफेनोफॉस ५० ई.सी.२० मिली किंवा थायक्लोप्रिड २१.७ एससी १५ मिली किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मिली किंवा एथिओन ५० ई.सी. १५.३० मिली किंवा क्लोरत्र्यनिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन प्रादेशिक संशोधन केंद्राचे कृषीतज्ज्ञ मंगेश दांडगे, योगेश इंगळे व केंद्राचे प्रमुख संजय साखरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.७ आॅगस्टपासून पावसाचा खंडसोयाबीन हे पावसासाठी अतिसंवेदनशील पीक आहे. यात ७ आॅगस्टपासून आजपर्यंत म्हणजे एक महिन्यापासून पावसाचा खंड असल्याने मध्यम व हलक्या स्वरुपाच्या जमिनीतील पीक धोक्यात आले आहे.