शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

फार्मसी आॅफिसरचा बेमुदत संप

By admin | Updated: June 23, 2014 23:38 IST

आरोग्य सेवेत औषधी निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्याच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील फॉर्मसी आॅफिसर

अमरावती : आरोग्य सेवेत औषधी निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्याच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील फॉर्मसी आॅफिसर असोसिएशनने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारादेखील निवेदनाद्वारे दिला आहे. महाराष्ट्र फार्मसी आॅफिसर असोशिएशनच्या प्रमुख मागण्यांमध्ये आरोग्य सेवेत ग्रामीण स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हास्तरावर रुग्णांकरिता औषध उपलब्ध करणे व रुग्णांना औषधाचे वाटप करणे ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करावी, औषध निर्माण अधिकारी यांना संपूर्ण सेवा काळात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने त्यांना पदोन्नतीची सेवा उपलब्ध करून द्यावी, फार्मसी अ‍ॅक्ट १९४८ कलम ४२ चे होत असलेले उल्लंघन टाळण्यासाठी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातील कमी करण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी पदाची पुनर्निर्मिती पूर्ववत दोन पदे कायम करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी फार्मसी आॅफिसर असोशिएशनने हे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात अध्यक्ष प्रकाश कोकर्डेकर, शरद बेथेरिया, रामदास कावरे, कार्याध्यक्ष अनिल राऊत, अब्दुल रहमान, अमोल वारकरी, जे. ए. वसतकर, मंदा वऱ्हे, एस. पी. थोरात, स्नेहल शिरभाते, आर. एस. ढबाले, शुभांगी सारवे, शैला रंगारी व अन्य फार्मासीचा समावेश होता. (प्रतिनिधी)