शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युपूर्व बयाण घेणे बंद

By admin | Updated: September 10, 2014 23:16 IST

महसूल कामाचा ताण बघता गुन्हेगारीशी संबंधित दाखल रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविणे बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने घेतला आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत

नायब तहसीलदार संघटनेचा निर्णय : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत न्यायालयाला पत्रअमरावती : महसूल कामाचा ताण बघता गुन्हेगारीशी संबंधित दाखल रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविणे बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने घेतला आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत न्यायालयाला पत्र देण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याकरिता अमरावती, भातकुली तालुक्यातील नायब तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी यांची संयुक्तपणे नेमणूक करण्यात आली आहे. चाकुहल्ला, विषप्राशन, भाजलेल्या रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याची जबाबदारी नायब तहसीलदारांवर आहे; मात्र, काही दिवसांपासून तहसीलदार व नायब तहसीलदारांवर कामांची जबाबदारी वाढली आहे. काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत तहसीलअंतर्गत कामांचा ताण वाढत आहे. हे पाहता महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मृत्युपूर्व बयाण घेणे बंद केले आहे. २९ आॅगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीतील व संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीच रुग्णांचे बयाण घेत आहेत. बयाण घेण्याविषयी तोडगा काढण्याकरिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना भेटून समस्या कथन केल्या. या समस्येचे निराकरण करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाला पत्राद्वारे कळविले आहे. मात्र अद्यापपर्यंत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेणार आहेत. त्यानंतर या समस्येचे निराकरण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. पोलीसच घेतात बयाणइर्विन रुग्णालयात गुन्हेगारी घडामोडीत रुग्ण दाखल होताच त्यांचे मृत्युपूर्व बयाण घेण्याकरिता तहसीलदार व नायब तहसीलदार यांना फोन करुन बोलविण्यात येत होते. मात्र, त्यांनी २९ आॅगस्टपासून हे बयाण घेणे बंद केल्याने रुग्णांचे बयाण संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी नोंदवीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागाची जबाबदारी वाढली आहे.