शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग हडपणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर दंडुका

By admin | Updated: October 10, 2016 00:13 IST

व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे.

अनधिकृत बांधकाम तोडणार : महापालिका आयुक्तांचे निर्देशअमरावती : व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. २२ संकुलातील पार्किंगच्या ठिकाणी केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार आहे. याशिवाय २३३ मालमत्ताधारकांना आठवडाभराची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. हा केवळ इशारा नसून पार्किंगची जागा हडपणाऱ्यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार असल्याचे आयुक्त हेमंत पवार यांनी स्पष्ट केले आहे. अतिक्रमण आणि असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आल्याच्या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी व्यावसायिक संकुलांनी केलेले अतिक्रमण आणि हडपलेल्या पार्किंगवर नजर रोखली होती. व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगसाठी परवानगी नसताना काही व्यापाऱ्यांनी पार्किंगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यानंतर झोन अभियंत्यांमार्फत तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर ३४० मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्यात. पार्किंगसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यासाठी विहित कालावधी देण्यात आला.या नोटीसला अनुसरून १०७ मालमत्ताधारकांनी कागदपत्रे सादर केली आहेत. १०७ मालमत्तांपैकी ३३ मालमत्तांची तपासणी करण्यात आली. त्यात २२ ठिकाणी पार्किंगच्या जागी अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आले. पुढील दोन आठवड्यात या २२ ठिकाणचे पार्किंग मोकळे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. कागदपत्रे सादर करणाऱ्या १०७ मालमत्ताधारकांपैकी उर्वरित ७४ मालमत्तांची या आठवड्यात पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पडताळणीनंतर अनधिकृत बांधकामाचा आकडा वाढणार आहे. ज्या २३३ मालमत्ताधारकांनी दस्तऐवज सादर केले नाहीत, त्यांना आठवड्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे बांधकाम अनधिकृत जाहीर करून प्रशासकीय कारवाई करण्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे. यासंदर्भात अधिनस्थांची बैठक घेण्यात आली. बैठकीला एडीटीपी सुरेंद्र कांबळे, अभियंता दीपक खडेकार, घनश्याम वाघाडे आदी उपस्थित होते. शहरातील बहुतांश व्यावसायिक संकुलधारकांनी पार्किंगची जागा गिळंकृत केल्याचे लक्षात येताच तपासणी मोहीम घेण्यात आली. ३४० मालमत्ताधारकांना नोटीसेस बजावण्यात आल्या. २२ ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर दोन आठवड्यात कारवाई केली जाईल.- हेमंत पवार, आयुक्त , महापालिका