सामदा येथील बांध फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:32+5:30

पुलाखालून जाणारे पाणी रोखल्या गेल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पावसाळ्याच्या तोंडावर नवीन पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, जुना बांध मोकळा न केल्याने ३० जून रोजी आलेल्या दमदार पावसामुळे गयाटीचा नाला तुडूंब भरून वाहिला आणि पुलाजवळ पाणी अडल्यामुळे सौंदळी परिसरात हा बांध फुटला. त्यामुळे सौंदळी-तोंगलाबाद परिसरातील १०० एकरांपेक्षा अधिक शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.

The dam at Samada burst | सामदा येथील बांध फुटला

सामदा येथील बांध फुटला

Next
ठळक मुद्देशेती खरडली : नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : दर्यापूर ते अकोला राज्य महामार्गावर लासूर ते तोंगलाबाद गावच्या मधातील गयाटी नाल्यावरील बांध फुटल्याने शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. त्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्या पुलाचे बांधकाम अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पुलाच्या बाजूला रस्ता करण्यात आला.
पुलाखालून जाणारे पाणी रोखल्या गेल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पावसाळ्याच्या तोंडावर नवीन पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, जुना बांध मोकळा न केल्याने ३० जून रोजी आलेल्या दमदार पावसामुळे गयाटीचा नाला तुडूंब भरून वाहिला आणि पुलाजवळ पाणी अडल्यामुळे सौंदळी परिसरात हा बांध फुटला. त्यामुळे सौंदळी-तोंगलाबाद परिसरातील १०० एकरांपेक्षा अधिक शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे आधीच कोरोना व दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यात नाल्याच्या पुराने शेती खरडल्याने ते हतबल झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सौंदळीचे सरपंच भारती देशमुख, तलाठी ब्राह्मणकर, तोंगलाबादचे पोलीस पाटील ललिता काळे यांनी त्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी शेतकरी अत्यंत आक्रमक होऊन नुकसानभरपाईची मागणी करत होते.

पुलाचे बांधकाम करण्यासाठी नाल्याला बांध घेण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नुकसान होईल, हे कंपनीला लेखी कळविले.. मात्र दुर्लक्ष केल्यामुळे आमच्या जमिनी पाण्याखाली गेल्या.
- वसंतराव तळोकर, शेतकरी, तोंगलाबाद

Web Title: The dam at Samada burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण