शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

टोकन पद्धतीने टळली बाजार समितीतील गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:01 IST

यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाला ५५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. परंतु पणन महासंघाची खरेदी सुरू झालेली नव्हती. त्यामुळे पुढे आणखी भाव वाढतील या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. मात्र, मध्येच देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यातच पणनची खरेदी बंद असल्याने शेतक्रायंना कापूस विक्रीस नेता आले नाही.

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्था; अखेरच्या दिवशी दुपारपर्यंत ४३७० शेतकऱ्यांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकऱ्यांचा घरात पडून राहिलेल्या कापसाच्या खरेदीकरिता पणन महासंघाने नोंदणीची प्रक्रिया राबविली. यामध्ये शनिवारी शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत ४३७० शेतकऱ्यांची नोंदणी आटोपल्याचे सूत्रांनी सांगितले.
यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाला ५५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. परंतु पणन महासंघाची खरेदी सुरू झालेली नव्हती. त्यामुळे पुढे आणखी भाव वाढतील या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. मात्र, मध्येच देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यातच पणनची खरेदी बंद असल्याने शेतक्रायंना कापूस विक्रीस नेता आले नाही. खरीप पेरणीकरिता पैशाची तरतूद ते कापूस विकून करणार होते. मात्र, आता पणनची खरेदी बंद होती. शेतकऱ्यांची चिंता वाढल्याने पणनची खरेदी सुरू करण्यासाठी शासनाला साकडे घालावे लागले. जेमतेम खरेदीचे आदेश धडकले. तर एकदम शेतकऱ्यांची गर्दी होऊन आणखी लॉकडाऊनचे उल्लंघन होऊन कोरोनाचा प्रकोप वाढेल, या भीतीने शेतकऱ्यांचा कापूस खरेदीकरिता आधी नोंदणी व तीदेखील मर्यादेत होईल, नंतर कापसाची खरेदी केली जाईल यासाठी ३ ते ६ जून दरम्यान प्रत्येक बाजार समितीत नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. अमरावती बाजार समितीत भातकुली, तिवसा व अमरावती या तीन तालुक्यांचा समावेश असल्याने स्थानिक बाजार समितीत आठ टेबलांवर नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, गर्दीने उच्चांक गाठलाच. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे वृत्त झळकले. त्यामुळे प्रशासनाने अखेरच्या दिवशी गर्दी वाढण्याची शक्यता पाहता नोंदणीकरिता येणाऱ्या शेतकऱ्यांकडून भरलेला फॉर्म घेऊन तात्पुरते टोकन देणे सुरू केले. यामुळे फॉर्म तपासणी व पावती लिहून देण्याचा वेळ वाचला. परिणामी शेतकऱ्यांना अधिक वेळ रांगेत उभे न ठेवता आले तसेच तात्पुरते टोकन घेऊन फोनद्वारे खरेदीची तारीख कळविली जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारी नोंदणी दरम्यान होणारी गर्दी टळली.

शनिवारी शेवटच्या दिवशी गर्दी राहील म्हणून शिदोरी घेऊन सकाळीच बाजार समिती गाठली. मात्र, येथे आल्याबरोबर नंबर लागल्याने त्रास वाचला.
- प्रकाश लांडे, शेतकरी, भगवानपूर

फोनद्वारे देणार शेतकऱ्यांना सूचना
शेतकºयांचा त्रास वाचविण्याकरिता तात्पुरते टोकन पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टळली. प्राप्त झालेल्या फॉर्मची प्रक्रिया गुरुवारपर्यंत पूर्ण करून त्यांना कापूस विक्रीकरिता केव्हा आणायचे, हे फोनद्वारे कळविले जाईल, असे अमरावती बाजार समितीचे निरीक्षक राजेश इंगोले यांनी सांगितले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी