शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काटकुंभच्या ‘मेघनाथ यात्रेत’ गर्दी

By admin | Updated: March 28, 2016 00:11 IST

आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी. मेळघाटात हा उत्सव पाच दिवस साजरा करण्यात आला.

आदिवासींची संस्कृती : शेकडोंनी फेडले नवस, आदिवासींचा जल्लोष नरेंद्र जावरे चिखलदराआदिवासींचा सर्वात मोठा सण होळी. मेळघाटात हा उत्सव पाच दिवस साजरा करण्यात आला. होळीचे औचित्य साधून शनिवारी काटकुंभ येथे रावणपुत्र मेघनाथाची एक दिवसीय यात्रा जल्लोषात साजरी करण्यात आली. शेकडोंनी या यात्रेत नवस फेडले, तर काहींनी मनातल्या सुप्त इच्छांच्या पूर्ततेसाठी नवस कबूल केले. सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये या यात्रेमुळे आनंदाला उधाण आले होते.यात्रेमध्ये रावणपुत्र मेघनाथाची पूजा आदिवासींनी केली. यावेळी जेरीचा लांब एक खांब गावशिवारावर रोवला जातो. त्यालाच मेघनाथ असे संबोधले जाते. मेळघाटात मोठ्या प्रमाणात आदिवासी, कोरकू व गोंड जमातीचे वास्तव्य आहे. हे आदिवासी आही पुरातन संस्कृतीला जपतात. होळी या सर्वात मोठ्या सणाच्या निमित्ताने आबालवृद्धांसाठी नवीन वस्त्र परिधान खरेदी केले जाते. गोडधोड जेवणाच्या भोजनावळी झडतात. मेघनाथ पूजेचे महत्त्वगावशिवारावर तयार केलेला जेरीचा लांब गगनभेदी खांब म्हणजे रावणपुत्र मेघनाथ. शुक्रवारी जारिदा, शनिवारी काटकुंभ येथे मेघनाथयात्रा भरली होती. वर्षभर रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले आदिवासी होळीनिमित्त गावी परतले होते. त्यामुळे गावांमध्ये वर्दळ होती. मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी मेघनाथ यात्रेत नवस फेडण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. मेघनाथाच्या पायथ्याशी काटकुंभ येथील भूमका कालू सुभाजी बेठेकर यांनी पूजाअर्चा केली. नंतर एका शिडीवरून वर चढविण्यात आले. आडव्या खांबाला दुपट्ट्याने बांधून प्रदक्षिणा घालून नवस फेडले गेला. वर्षपरंपरेनुसार काटकुंभ व परिसरातील ६० पेक्षा अधिक खेड्यांतील शेकडो आदिवासींनी हजेरी लावली होती.