शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तूर नोंदणीसाठी केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

नांदगावातील खरेदी-विक्री संस्थेत नाफेड तूर खरेदीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. गतवर्षी येथील केंद्राला तूर खरेदीसाठी ३ हजार ६६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ३८० शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली होती. खासगी तूर खरेदी चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सुरू आहे, तर शासनाचा हमीभाव ५८०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे.

ठळक मुद्देऑनलाईन नोंदणी : ९०० शेतकऱ्यांकडून अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : शासनाच्या नाफेड तूर खरेदीसाठी १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. पहिल्या दिवशी सुमारे ९०० शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज सादर केले. नोंदणीसाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी उसळल्याने पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. नोंदणीची प्रक्रिया १४ फेब्रुवारीपर्यंतच असल्यामुळे शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.नांदगावातील खरेदी-विक्री संस्थेत नाफेड तूर खरेदीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. गतवर्षी येथील केंद्राला तूर खरेदीसाठी ३ हजार ६६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ३८० शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली होती. खासगी तूर खरेदी चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सुरू आहे, तर शासनाचा हमीभाव ५८०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे.नाफेड व खासगी तुरीला मिळणाऱ्या भावात सुमारे आठशे ते हजार रुपयांची तफावत असल्याने नाफेडकडे तूर विक्रीसाठी आणण्यास शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. त्यादृष्टीने येथे सुविधा व्हाव्यात, अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.जिल्ह्यातील इतर तूर नोंदणी केंद्रांवर महिन्याभरापासून नोंदणीचे काम सुरू झाले होते. पण, नांदगाव खंडेश्वर येथील केंद्रावर नोंदणी प्रक्रियेला उशिरा मान्यता मिळाली. यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता खरेदी केंद्रावरील नोंदणीची मुदत वाढवून देण्यात यावी, अन्यथा तालुक्यातील बरेच शेतकरी वंचित राहतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनMarketबाजार