शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दाखल होणार फौजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 00:14 IST

जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन (ग्रामीण) मार्फत जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायती पहिल्या टप्यात हगणदारी मुक्त करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद : ५८९ ग्रामपंचायतीत १६ जानेवारीपासून अंमलबजावणी अमरावती : जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन (ग्रामीण) मार्फत जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायती पहिल्या टप्यात हगणदारी मुक्त करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने येत्या १६ जानेवारीपासून जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशन कक्ष व सर्व विभागाच्या समन्वयातून धडक मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी ४१४ ग्रामपंचायतीमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. सध्यास्थितीत २५० ग्रामपंचायती हगणदारी मुक्त झाल्या आहेत. तर उर्वरित ५८९ ग्रामपंचायती मार्च २०१८ पूर्वी हगणदारी मुक्त करण्यासाठी गावागावांत जनजागृतीचे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. परंतु अद्यापही बऱ्याच गावातील ग्रामस्थांमध्ये अपेक्षित असलेला बदल दिसून येत नाही. त्यामुळे गृहविभागाच्या २००८-०९ मधील परिपत्रकानुसार उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ ते ११७ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत. याशिवाय संबंधित दोषी व्यक्तीला सहा महिन्याचा कारावास व प्रति दिवस बाराशे रूपये दंड आकारण्याची तरतूद आहे.यानुसार १६ जानेवारी पासून उघडयावर शौचास बसणाऱ्या विरोधात धडक कारवाईची मोहीम जिल्हाभरात राबविली जाणार आहे. स्वच्छता मिशन अभियान जिल्हा परिषदेत गांभीर्याने राबविले जात आहे. (प्रतिनिधी) १४ पथके देणार आकस्मिक भेट जिल्हास्तरावरून गाव पातळीवर पहाटे आकस्मिक भेटीसाठी जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली १४ पथकांचे गठन केले आहे. या मोहीमेसाठी सीईओ किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशन विभागाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे व त्याचे सहकारी या मोहीमेचे नियोजन करत आहेत.