शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत भाडे नियंत्रण कायदा न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 11:37 IST

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी अमरावती येथे भाडे नियंत्रण कायदा न्यायालय कार्यान्वित केले जाणार आहे. गृहनिर्माण विभागाने ६ एप्रिलला औरंगाबाद आणि अमरावती येथे दोन कार्यालयांची नव्याने स्थापना करण्यास मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देनव्याने स्थापनासक्षम प्राधिकाऱ्यासह ८ अधिकारी कर्मचारी राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांसाठी अमरावती येथे भाडे नियंत्रण कायदा न्यायालय कार्यान्वित केले जाणार आहे. गृहनिर्माण विभागाने ६ एप्रिलला औरंगाबाद आणि अमरावती येथे दोन कार्यालयांची नव्याने स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. सक्षम प्राधिकारी हे या न्यायालायाचे प्रमुख असतील.महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत येणाऱ्या घरमालक व भाडेकरू यांच्यातील कोणत्याही वादावर निर्णय देण्याकरिता राज्यात कोकण, पुणे, नाशिक व नागपूर या चार विभागांसाठी स्वतंत्र सक्षम प्राधिकारी, भाडे नियंत्रण कायदा न्यायालयांची कार्यालये निर्माण करण्यात आली. मात्र, नागपूर, अमरावती, औरंगाबाद विभागाची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली होती. या ठिकाणी स्वतंत्र न्यायालये नव्हती. दरम्यान, भाडे नियंत्रण कायदा न्यायालयांचे सक्षमीकरण करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने भाडे नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नियम बनविणे, राज्यातील सर्व सक्षम प्राधिकारी, भाडे नियंत्रण कायदा न्यायालयाच्या कार्यालयात पदांच्या नियमित नियुक्ती होण्याकरिता नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्या आदेशाच्या अनुषंगाने अमरावती विभागासाठी अमरावती येथे स्वतंत्र भाडे नियंत्रण कार्यालय स्थापन करून या कार्यालयात नवीन पदभरतीस शासनाने मान्यता दिली आहे.असे राहतील अधिकारी-कर्मचारीभाडे नियंत्रण कायदा न्यायालयाच्या नव्या कार्यालयात प्रत्येकी १ सक्षम प्राधिकारी, अधीक्षक (वर्ग २), निम्नश्रेणी लघुलेखक व प्रोसेस सर्वर यांच्यासह प्रत्येकी दोन लिपिक व शिपाई राहणार आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय