शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाचे काऊंटडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसीकरिता राखीव आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद पटकाविण्यासाठी २९ सदस्यसंख्या आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ पैकी २ व शिवसेनेचे ३ असे एकूण ३१ सदस्य आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद । महाआघाडी जोरात, विरोधकांची स्थिती दोलायमान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यमंत्र्याचा दर्जा लाभलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपली आहे. ६ जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाआघाडी सज्ज आहे, तर विरोधी पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला राजकीय आकडेमोड साध्य करता आली नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाआघाडीकडे राहील, असे चित्र सद्यस्थितीत आहे. ५७ सदस्यीय जिल्हा परिषदे मध्ये भाजपचे १३ सदस्य असल्याने ते सत्तेसमीकरण जुळवू शकत नसल्याचे दिसत आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसीकरिता राखीव आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद पटकाविण्यासाठी २९ सदस्यसंख्या आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ पैकी २ व शिवसेनेचे ३ असे एकूण ३१ सदस्य आहेत.भाजपचे १३, प्रहार ५, युवा स्वाभिमान २, तर बसप, लढा व अपक्ष प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल विरोधकांकडे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे ३१ सदस्य वगळता राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकुमार पटेल गटाचे तीन सदस्यसुद्धा यावेळी महाविकास आघाडीसोबत गेल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सदस्यसंख्या ३४ वर पोहोचली आहे. भाजप व अन्य सहकारी २३ या सदस्यसंख्येवरच स्थिरावतात.मागील अडीच वर्षांतसुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षपदाला शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोघांनी टेकू दिला होता. उपाध्यक्षपद पदरात शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. ६ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडीदरम्यानही मागील कित्ता गिरविला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.जिल्हा परिषदेच्या पुढील कालावधीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक ही आता केवळ २४ तासांवर आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषदेची सत्ता सद्यस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. ही सत्ता उर्वरित कालावधीसाठी कायम ठेवण्याकरिता महाविकास आघाडीचे नेते जोमाने कामाला लागले आहेत. सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या मॅजिक फिगरच्या पलीकडे महाविकास आघाडीने संख्याबळ जुळविले आहे. सत्तास्थापनेकरिता लागणारी मॅजिक फिगर जुळत नसल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या गोटात शांतता असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसकडे अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची चिन्हे आहेत.सत्ताधाऱ्यांचे पर्यटनजिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीने सत्तास्थापनेवर सदस्यसंख्येच्या बळावर प्रबळ दावेदारी ठोकली आहे. असे असले तरी यामध्ये कुठेही दगाबाजी होऊ नये, याकरिता महाआघाडीत सर्व सदस्य ताडोबा येथे पर्यटनवारी शुक्रवारी रवाना करण्यात आले आहेत. दुसरीकडे भाजप व अन्य सहकारी पक्षांचे सदस्य आपआपल्या सर्कलमध्ये असल्याचे माहिती आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत उमेदवारी अर्जाची उचल करता येईल व परिपूर्ण अर्ज दाखल करता येणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी दुपारी ३ वाजता विशेष सभेचे कामकाज सुरू होणार आहे. ३.१५ वाजेपर्यंत अर्जाची छाननी व वैध अर्ज असलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविली जाणार आहेत. त्यानंतर लगेच उमेदवारी अर्जाची माघार व आवश्यकता असल्यास पहिल्यांदा अध्यक्षपदाकरिता मतदान व त्यानंतर लगेच उपाध्यक्षपदाकरिता मतदान होणार आहे. अमरावतीचे उपविभागीय अधिकारी हे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज हाताळतील.

टॅग्स :zpजिल्हा परिषद