शंकरबाबा पापळकरांनी घेतली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:47+5:302021-03-04T04:22:47+5:30

फोटो पी ०२ पापळकर परतवाडा : ज्येष्ठ समाजसेवक ‘अनाथांचे नाथ’ शंकरबाबा पापळकर यांनी मंगळवारी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस ...

Corona vaccine taken by Shankar Baba Papalkar | शंकरबाबा पापळकरांनी घेतली कोरोना लस

शंकरबाबा पापळकरांनी घेतली कोरोना लस

फोटो पी ०२ पापळकर

परतवाडा : ज्येष्ठ समाजसेवक ‘अनाथांचे नाथ’ शंकरबाबा पापळकर यांनी मंगळवारी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेतली. जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पापळकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना कोरोना लस घेण्याचा सल्ला दिला होता.

अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी अचलपूर तालुक्यातील वज्झर येथील आश्रमातून शंकरबाबांचे आधार कार्ड मागून घेतले होते. सकाळी ११ वाजता उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले, परिचारिका अलका तायडे, शीतल खेडेकर यांनी शंकरबाबांना कोरोनाची लस दिली. यावेळी बाबांसोबत मुख्याध्यापक नंदकिशोर आकोलकर, मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक अनिल पिहुलकर उपस्थित होते.

बॉक्स

डॉक्टरांचे धरले पाय

आपण आमच्यासाठी देव आहात, असे म्हणत शंकरबाबांनी उपस्थित डॉक्टर, परिचारिकेचा पदस्पर्श करून त्यांचे आभार मानले. ग्रामपंचायत, नगरपालिका, महसूल, पोलीस, आरोग्य यांसह सर्व विभागाचे कार्य या संकटाला निवारून नेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कोट

मी ८० वर्षांचा आहे. मंगळवारी मी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेतली. मी माझ्या १२३ अनाथ, अपंग, गतिमंद मुलांच्या रक्षणासाठी ही लस घेतली. शासनाच्या धोरणाचा ६० वर्षांवरील वृद्धांनी लाभ घेऊन स्वत:ची व त्यांच्या कुटुंबीयांचे रक्षण करावे. सर्वांनी त्रिसूत्रीचे पालन करावे.

- शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक, वज्झर

Web Title: Corona vaccine taken by Shankar Baba Papalkar