कोरोनाची उसळी, दहा महिन्यांत २२,२७६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST2021-02-05T05:30:40+5:302021-02-05T05:30:40+5:30

अमरावती : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या दहा महिन्यांच्या काळात म्हणजेच ३०६ दिवसांत २२ हजार २७६ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. दर ...

Corona surge, 22,276 positive in ten months | कोरोनाची उसळी, दहा महिन्यांत २२,२७६ पॉझिटिव्ह

कोरोनाची उसळी, दहा महिन्यांत २२,२७६ पॉझिटिव्ह

अमरावती : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या दहा महिन्यांच्या काळात म्हणजेच ३०६ दिवसांत २२ हजार २७६ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. दर दिवशी सरासरी ७२.४४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद या काळात झालेली आहे. सध्या या आठवड्यात संसर्ग पुन्हा वाढला असल्याने, दररोज १०० च्यावर पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे.

कोरोनाच्या ३०६ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग अचलपूर तालुक्यात झाला आहे. या तालुक्यात कोरोनाग्रस्त एक हजारांवर, तर वरूड तालुक्यात ९०० च्या घरात आता संसर्ग पोहोचला आहे. अमरावती शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता १४ हजार पार गेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर कोरोना संसर्ग चांगलाच वाढला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन यावेळी झाले नाही.

जिल्ह्यात रोज किमान चार हजार चाचण्या करण्याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाचे निर्देश आहेत, सद्यस्थितीत चाचण्या ५०० ते ७०० चाचण्या होत असल्याने संसर्गाला आळा बसण्याऐवजी संसर्गग्रस्त लक्षणेविरहित रुग्ण समाजात मोकळे आहेत. परिणामी रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

बॉक्स

चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण १७ टक्के

जिल्ह्यात बुधवारी १,०२७ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण १६.७२ टक्के हे चिंताजनक आहे. बुधवारी दोन कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता ४२२ झाली आहे.

बॉक्स

असे वाढत आहे रुग्ण

दिनांक रुग्ण

२८ जानेवारी ७८

२९ जानेवारी ९३

३० जानेवारी १४९

३१ जानेवारी १२८

०१ फेब्रुवारी ९२

०२ फेब्रुवारी ११८

०३ फेब्रुवारी १७९

बॉक्स

मास्क, फिजिकल डिस्टन्स कोठे?

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावणे, हात वारंवार साबणाने किंवा सॅनिटायझरने धुणे व यासोबतच फिजिकल डिस्टन्स पाळणे महत्त्वाचे आहे. मात्र, याचा विसर नागरिकांना पडला आहे. यासाठी असलेली जिल्हा प्रशासनाची विशेष मोहिम सद्यस्थितीत थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येते.

बॉक्स

कोरोनाची जिल्हास्थिती

Web Title: Corona surge, 22,276 positive in ten months