शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

किडनी प्रत्यारोपणात कोरोनाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST

अमरावती : येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे दर महिन्याला किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत होत्या. मध्येच कोरोना ...

अमरावती : येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे दर महिन्याला किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत होत्या. मध्येच कोरोना विषाणूचा शिरकाव झाला नि ती प्रक्रिया थांबली. त्यामुळे गरजूंना डायलिसीसच्या आधारे जगावे लागत आहे. गतवर्षी केवळ तीन शस्त्रक्रिया होऊ शकल्या.

किडनीच्या रुग्णांवर कोरोनाचा प्रादुर्भाव शिघ्र गतीने होणार असल्याने वरिष्ठ स्तरावरूनच किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान येथील सुपर स्पेशालिटीत जानेवारी २०२० मध्ये एक किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारीत एक आणि ७ मार्च रोजी एका रुग्णावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार वाढताच २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. एका रुग्णावर २८ मार्च २०२० रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती. त्यासंबंधीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. परंतु, आदेशानुसार होऊ घातलेली शस्त्रक्रिया थांबवावी लागली. परंतु, सदर रुग्णावर वेळोवेळी योग्य औषधोपचार करण्यात आल्याने त्या रुग्णाला वाचवण्यात यश आल्याची माहिती डॉ. कल्पना भागवत यांनी दिली.

बॉक्स

कोरोनानेही घेरले होते

बडनेरा येथील ३० वर्षीय इरफान खान यांच्यावर नियोजित केलेली शस्त्रक्रिया कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता थांबविली खरी, मात्र दरम्यानच कोरोनाचे त्यांच्यावर अटॅक केला. त्यावरही औषधोपचाराने मात करून मृत्यूच्या दाढेतून ते बाहेर आले. आता काही महिन्यांतच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू होणार असून, प्रथम त्यांचीच शस्त्रक्रिया केली जाईल, असे तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

यवतमाळहून होतेय क्लिअरन्स

रुग्णाला किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया करताना आधी यवतमाळ येथील शासकीय मेडिकल कॉलेजच्या राज्य प्राधिकार समिती (स्टेट ऑथोरायझेशन कमिटी)ला रुग्णाच्या संपूर्ण तपासणी अहवालाची माहिती व किडनी दान करणाऱ्यांच्याची आरोग्याविषयी इत्थंभूत माहितीची फाईल पाठविली जाते. त्यावर समिती शहानिशा करून शस्त्रक्रियेबाबत सूचना देते. साधारणत: महिन्यातून एक फाईल येथून पाठविली जायची. मात्र ११ महिन्यांच्या काळात एक फाईल १ जानेवारी २०२१ रोजी पाठविली असून, चार रुग्ण वेटिंग असल्याची माहिती डॉ. भागवत यांनी दिली.

नागपूर ट्रान्सल्पांट सर्जनची उपलब्धी

किडनी प्रत्यारोपणाकरिता नागपूरहून सर्जन बोलावले जाते. येथील युरो सर्जन म्हणून राहुल पोटोडे, विक्रम देशमुख, विशाल बाहेकर, राहुल घुले या डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य असते.

कोट

कोरोनामुळे सर्वच शस्त्रक्रिया थांबविल्या होत्या. परंतु, आता डोळ्यापासून तर सर्वच शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. त्यातच किडनी प्रत्यारोपण अतिशय चिंतेचा विषय आहे. परंत, फेब्रुवारीमध्ये तीदेखील सुरू

केली जाईल.- श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्य चिकित्सक

२८ मार्च २०२० रोजी एका रुग्णावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार होती. मात्र येथे किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया कोरोना काळात थांबल्याविण्यात आली आहे. पुन्हा सुरू करण्यासंदर्भात १८ जानेवारी रोजी बैठक पार पडली. यानुसार