शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे आश्रमशाळांचे ऑनलाईन शिक्षण बारगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या बहुतांश निवासी आश्रमशाळा कोरोना संसर्गामुळे बंद आहेत. शासनाने शाळा, आश्रमशाळा सुरू करण्याचे आदेश जारी ...

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या बहुतांश निवासी आश्रमशाळा कोरोना संसर्गामुळे बंद आहेत. शासनाने शाळा, आश्रमशाळा सुरू करण्याचे आदेश जारी केले असले तरी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची नकारघंटा आहे. किंबहुना ग्रामीण, डोंगराळ भागात ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलला नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बारगळल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकाही आश्रमशाळेत विद्यार्थी पोहोचले नसल्याची माहिती आहे.

शालेय शिक्षण विभागाने इयत्ता दहावी, बारावीच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जारी केला आहे. त्यामुळे या परीक्षा केंद्रावर होतील, हे निश्चित झाले आहे. मात्र, गतवर्षी मार्चपासून प्रारंभ झालेला कोविड-१९ आजतागायत कायम आहे. हल्ली शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विशेषत: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यात शहरी भागातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. मात्र, ग्रामीण, डोंगराळ भागातील आश्रमशाळा सुरू झाल्या. मात्र, आदिवासी विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचले नाही, असे सर्वदूर चित्र आहे. त्यामुळे दहावी, बारावीतील आश्रमशाळांचे आदिवासी विद्यार्थ्यांचे

अभ्यासक्रम पूर्ण झाले अथवा नाही, याचा लेखाजोखा शिक्षकांकडेही नाही. दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये प्रस्तावित आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालाच नाही, तर आश्रमशाळांचे आदिवासी विद्यार्थी परीक्षा कशी देणार, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत सात प्रकल्पांत अनुदानित आश्रमशाळा १२१, तर विद्यार्थिसंख्या ४६ हजार ८०७ आहे. शासकीत आश्रमशाळा ८२ असून, विद्यार्थिसंख्या २७ हजार १९५ आहे.

------------------------------------

अपर आयुक्त अंतर्गत शासकीय आश्रमशाळांची स्थिती

प्रकल्पाचे नाव संख्या विद्यार्थी

धारणी २० ९४५७

पांढरकवडा १८ ३१११

किनवट १६ ५७०८

अकोला ८ २६६३

औरंगाबाद ८ २३१३

पुसद ७ २११५

कळमनुरी ५ १८२८

-----------------------

‘ट्रायबल’मध्ये अगोदर अनलॉक शिक्षण सुरू झाले. त्यानंतर पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. आता लॉकडाऊन घोषित आहे. कोविड-१९ मुळे अध्ययन-अध्यापनात अनियमितता आली असून, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

- विजय पांडे, प्रभारी सहायक आयुक्त, (प्रशासन) अपर आयुक्त, अमरावती