शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना डेथ ऑडिट, 80 टक्के रुग्णांना आधीपासून आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

 जिल्ह्यात पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद ४ एप्रिल २०२० रोजी झाली. या महिन्यात १० मृत्यू, मेमध्ये ५, जूनमध्ये ९, जुलैमध्ये ४०, ऑगस्टमध्ये ७४, सप्टेंबरमध्ये १५४, ऑक्टोबरमध्ये ७२, नोव्हेंबरमध्ये १४, डिसेंबरमध्ये १८, जानेवारीमध्ये २२, फेब्रुवारीमध्ये ९२, मार्चमध्ये १६४, एप्रिलमध्ये ४१०, मेमध्ये २८९ व जून महिन्यात १९ दिवसांत ७२ रुग्णांचा मृत्यू झाला. या दुसऱ्या लाटेत ७० हजारांवर संक्रमित व एक हजारांवर रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदुसरी लाट ओसरली, जिल्हा अनलॉक, कोरोना नियमांचे पालन महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोनामुळे १,५४० रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ८० टक्के रुग्णांना संसर्गाच्या आधीपासून आजार असल्याची आरोग्य विभागाकडे नोंद आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार असणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 
 जिल्ह्यात पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद ४ एप्रिल २०२० रोजी झाली. या महिन्यात १० मृत्यू, मेमध्ये ५, जूनमध्ये ९, जुलैमध्ये ४०, ऑगस्टमध्ये ७४, सप्टेंबरमध्ये १५४, ऑक्टोबरमध्ये ७२, नोव्हेंबरमध्ये १४, डिसेंबरमध्ये १८, जानेवारीमध्ये २२, फेब्रुवारीमध्ये ९२, मार्चमध्ये १६४, एप्रिलमध्ये ४१०, मेमध्ये २८९ व जून महिन्यात १९ दिवसांत ७२ रुग्णांचा मृत्यू झाला. या दुसऱ्या लाटेत ७० हजारांवर संक्रमित व एक हजारांवर रुग्णांचा मृत्यू झाला. यासाठी विविध कारणे असली तरी मृत रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांना सहव्याधी असल्याची बाब आरोग्य विभागाचे ‘डेथ ऑडिट’मध्ये स्पष्ट झालेली आहे.
 अंगावर लक्षणे काढणे, नमुने उशिरा देणे, रोगप्रतिकारशक्तीत घट यामुळे अनेक रुग्णांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याचे दिसून येते. अशा परिस्थिती सहव्याधी रुग्णांसाठी धोकादायक ठरली आहे.
प्रशासनाद्वारा सातत्याने आशा व एएनएम पथकाद्वारे कॉमर्बिडिटीचे रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये नोंद झालेल्या रुग्णांना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शनदेखील करण्यात आले होते. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

 मृतांमध्ये ७० टक्के रुग्ण शुगर, बीपीचे
 जिल्ह्यात कोरोना संक्रमितांचे मृत्यूपश्चात झालेल्या ऑडिटमध्ये ७० टक्के रुग्णांना मधुमेह व रक्तचापासारखे आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने संसर्ग झाल्यानंतर वेळीच खबरदारी न घेतल्यास प्रकृती गंभीर होत असल्याचे दिसून येते. अनेक रुग्णांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय हृदयरोग,  किडनी विकार यांसारखे १४ आजार दगावलेल्यांपैकी ८० टक्क्यांना आधीच होते. 

उपचाराच्या पहिल्या २४ तासात ७८ रुग्णांचा मृत्यू
कोरोनाची लक्षणे अंगावर काढणे ही बाब अंगलट येणारी आहे. यामध्ये उपाचारार्थ दाखल केल्याचे २४ तासांत ७८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. एक ते दोन दिवसांत ९२ व तीन ते सात दिवसांत ८५७ व त्यापेक्षा जास्त दिवसांत ५१४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू