पहिली प्रवेशाला कोरोनाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:02 IST2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:02:00+5:30

दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वगार्तील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया घेण्यात येतात आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची पटनोंदणी करावी लागते. यासाठी संबंधित शाळातील शिक्षक गावात फिरून जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थ्याना कसा प्रवेश देता येईल यासाठी प्रयत्न करत असतात.

Corona barrier at First standard Admission | पहिली प्रवेशाला कोरोनाचा अडसर

पहिली प्रवेशाला कोरोनाचा अडसर

ठळक मुद्देप्रशासनही संभ्रमात : प्रक्रिया पडणार लांबणीवर, जून महिना उजाडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिलीच्या प्रवाशांना यंदा कोरोनाचा अडसर उभा राहिला आहे.कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार असून त्यासाठी जून महिना उजाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वगार्तील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया घेण्यात येतात आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची पटनोंदणी करावी लागते. यासाठी संबंधित शाळातील शिक्षक गावात फिरून जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थ्याना कसा प्रवेश देता येईल यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच या दोन महिन्यात पालक देखील विद्यार्थ्याना शाळेची सवय लागावी यासाठी या नव्या विद्यार्थ्याना शाळेत आणून बसवितात यंदा मार्च महिन्यात अवघी १५ दिवस शाळा झाली जिल्ह्यात कोरोनाणा संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोनजा केल्या जात आहेत. लॉकडाऊन करण्यात आले आहे.याचा फटका यंदा पहिलीच्या पटनोंदणीला आणि प्रवेश प्रक्रियेला बसण्याची शक्यता आहे. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर पहिलीचा वर्ग असणाºया शिक्षकांची या वर्गासाठी विद्यार्थ्याना शोधण्यासाठी धावपळ उडणार आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग आणखी किती दिवस राहणार यावर पुढील शैक्षणिक वर्षाचे भवितव्य अवलंबून आहे.

सध्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसह संचारबंदी लागू आहे.त्यामुळे झेडपी शाळेतील पहिल्याच्या प्रवेशाबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. सध्याची परिस्थिती लक्षता घेता प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी प्राथमिक
 

Web Title: Corona barrier at First standard Admission