शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराचा पारंपरिक बाज हरपला

By admin | Updated: October 6, 2014 23:05 IST

प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा ट्रेंड बदलू लागला आहे. दिवसागणिक प्रचाराची यंत्रणा हायटेक होऊ लागल्याने जमिनीवरची रंगत हरपली आहे. यामध्ये पूर्वी अनुभवाला येणारी रणधुमाळी, गगनभेदी घोषणा काळाच्या

गजानन मोहोड - अमरावतीप्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा ट्रेंड बदलू लागला आहे. दिवसागणिक प्रचाराची यंत्रणा हायटेक होऊ लागल्याने जमिनीवरची रंगत हरपली आहे. यामध्ये पूर्वी अनुभवाला येणारी रणधुमाळी, गगनभेदी घोषणा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. येऊन येऊन येणार कोण?आमच्याशिवाय हायेच कोण,ताई बाई अक्का,विचार करा पक्का.... वरच माया शिक्का, अशा घोषणा आता निवडणूक प्रचारातून बंद झाल्यात. मतदान यंत्रामुळे (ईव्हीएम) शिक्का शब्द कालबाह्य झाला. या सर्व प्रकारांची जागा आता इंटरनेट, फेसबूक, टष्ट्वीटर या हायटेक प्रचार माध्यमांनी घेतल्याने प्रचाराचा पारंपरिक बाज यात हरपला आहे. निवडणूक म्हटली की, रणधुमाळी आलीच. पूर्वी उमेदवारांची रॅली म्हटली की, विरोधकांची खिल्ली उडवीत स्वत:चे कर्तव्य सिद्ध करणाऱ्या गगनभेदी घोषणा परिसर दणाणून सोडायच्या. आपलीच पार्टी किती शक्तिशाली आहे याचा गौरव घोषणांनी व्हायचा. आता यावर आदर्श आचारसंहितेने बंधने घातली आहेत. तसे पाहता राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांच्या मुसक्या निवडणूक आचारसंहितेने आवळल्या आहेत. पैशाच्या वारेमाप उधळपट्टीवर आता लगाम घातला गेला आहे. निवडणुकीमध्ये पूर्वी जो प्रचाराचा जोश होता तो आता राहिला नाही. यामुळे कार्यकर्त्यांध्येदेखील निरूत्साह आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आधी उमेदवार निश्चित होत होते. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी कित्येक दिवस अगोदर सुरू व्हायची. यावेळीही विधानसभा निवडणुकीत नामांकन भरण्याच्या अंतिम दिवशी महायुती व आघाडी यांच्या घटकपक्षात ताटातुट झाली. स्वबळावर लढण्याचे पावित्र्याने ऐनवेळी उमेदवार जाहीर केल्या गेले. बोटावर मोजण्याईतकेही दिवस प्रचाराला मिळत आहेत. अंतिम क्षणात विरोधकांवर कुरघोडी करून उमेदवार बदलविण्याच्या राजकीय पक्षाच्या धोरणामुळेही प्रचाराचा पारंपारिक बाज हरपला आहे.पूर्वीच्या निवडणुकीत गावातील दर्शनी भागावरील भिंती या प्रचारार्थ रंगविल्या जायच्या. त्याची जागा आता होर्डींग, फ्लेक्स व कटआऊटने घेतली आहे. पूर्वी गावातील पेंटरचा उपयोग भिंती रंगविण्यासाठी केला जायचा. आता निडणूक प्रचारापासून तर मतदानापर्यंत ईलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.