शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

फळे, भाजीपाला विक्रीवर ‘डीडीआर’चे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 00:53 IST

शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेली फळे व भाजीपाला बाजार समितीच्या बाहेर विकण्यास आता मुभा राहणार आहे.

संभ्रम कायम : शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेर मालविक्रीस मुभा अमरावती : शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेली फळे व भाजीपाला बाजार समितीच्या बाहेर विकण्यास आता मुभा राहणार आहे. परंतु हा व्यवसाय जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधकांच्या नियंत्रणाखाली राहील. कायद्यामधील बदलाचा प्रस्ताव शासनाने राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याने बाजार समितीबाहेरील शेतकऱ्यांची मालविक्री १०० टक्के नियंत्रणमुक्त नाही, हे स्पष्ट झाले आहे. अशा व्यवहारात व्यापाऱ्याकडून फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न निर्माण झाला. यासाठी काही तरी नियमन असावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्यामुळे याची दखल शासनाने घेतली आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न व पणन् अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे बाजार समितीचा अडसर दूर होऊन शेतकऱ्यांची फळे व भाजीपाला ग्राहकांच्या दारात विक्रीची मुभा मिळाली आहे. आतापर्यंत या व्यवहारावर बाजार समित्यांचे नियंत्रण होते. मात्र, बाजार समितीमध्ये गैरव्यवहार व शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याने बाजारसमितीच्या कचाट्यामधून शेतकऱ्यांना मोकळे करावे, अशी मागणी होत असल्याने शासनाने बाजार समितीचे नियंत्रण सैल केले. त्यानुसार शेतकरी वाटेल तेथे माल विकू लागला. मात्र, त्यावर कुणाचेही नियंत्रण न राहिल्यास त्याची दलालाकडून फसवणूक होण्याची भीती व्यक्त झाली. अडतचे ८ ते १० टक्के वाचणार अमरावती : त्यामुळे शासनाने कायद्यात बदल करताना बाजार समितीच्या बाहेरील शेतमाल विक्रीवर जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधकांचे नियंत्रण राहील, अशी तरतूद केली आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विकता येणार आहे. त्यामुळे अडत, दलाल, हमाल, तोलारी यासाठीची १० टक्क्यांपर्यंतची रक्कम वाचणार आहे. मध्यस्थांची साखळी नसल्याने ग्राहकांना शेतमाल योग्य भावाने मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने कायद्यातील बदलास मंजुरी दिली आहे. त्यानुसार संबंधित घटकांची मते जाणून घेऊन हा अध्यादेश राज्यपालांकडे पाठविला आहे. - चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री