शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाईचा एकमताने ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:01 IST

खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी महाबीजसह खासगी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु, पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला आहे. कृषी विभागाकडे याबाबत ४ हजार ७३२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ४ हजार ६६३ तक्रारींच्या अनुषंगाने शिवारातील पिकांची पाहणी कृषी विभागाने केली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : स्थायी समिती सदस्य आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये आणि बहुमोल परिश्रम वाया घालविणाºया बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाईचा ठराव शुक्रवारी एकमताने पारित करण्यात आला. या ठरावावर तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुद्द्यांवर स्थायी समितीच्या सभेत पदाधिकारी, सदस्य आक्रमक झाले.खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी महाबीजसह खासगी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु, पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला आहे. कृषी विभागाकडे याबाबत ४ हजार ७३२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ४ हजार ६६३ तक्रारींच्या अनुषंगाने शिवारातील पिकांची पाहणी कृषी विभागाने केली. यामध्ये ३ हजार ४८ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले, तर १५४४ तक्रारी तथ्यहीन आढळल्याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी अनिल खर्चान यांनी ७ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद स्थायी समिती पदाधिकारी व सदस्यांनी विचारलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने लेखी स्वरूपात दिली. विशेष म्हणजे, या तक्रारींमध्ये २ हजार २१ तक्रारी या महाबीजसंबंधी व उर्वरित तक्रारी खासगी कंपन्यांबाबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या नुकसानापोटी आतापर्यंत ८१२ शेतकऱ्यांना ८६७ बॅग सोयाबीन व ४८ लाख ६६ हजार २१२ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली असल्याचे या अहवालात नमूद आहे. परंतु, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई मिळाली नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, सदस्य सुहासिनी ढेपे यांनी आक्रमक होत, हा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही; शेतकऱ्यांना बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यावर तातडीने कारवाई करावी, असा ठराव खुद्द अध्यक्षांनी सभागृहाचे पटलावर मांडला. सदर ठराव हा एकमताने स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. कंपन्यावर कारवाई व नुकसानभरपाई शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, अशा आशयाचा ठराव राज्य शासनाकडे पाठविली जाणार आहे. एकूणच बोगस बियाण्याच्या मुद्द्यावर सभागृहात वादळी चर्चा झाली. सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती दयाराम क ाळे, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य जयंत देशमुख, अभिजित बोके, सुनील डिके, नितीन गोंडाणे, सुहासिनी ढेपे, सीईओ अमोल येडगे व अन्य अधिकारी उपस्थित होते.सर्व डेटा पाठविलासोयाबीनच्या बोगस बियाण्याचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांबाबत शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारींची चौकशी व त्याअनुषंगाने कृषी विभागाच्यावतीने महाबीजसह खासगी कंपन्यांचा बियाण्यांबाबतचा सर्व डेटा पाठविण्यात आला आहे. कृषी विभागाकडून याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाºयांनी सभागृहात सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदagricultureशेती