राहुल गांधी यांच्या काफिल्यावरील भ्याड हल्ल्याचा काँग्रेसद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:21 IST2017-08-05T23:21:32+5:302017-08-05T23:21:53+5:30

अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या काफिल्यावर गुजरात राज्यात बनासकांडा या गावात

Congress protests Rahul Gandhi's grave attack | राहुल गांधी यांच्या काफिल्यावरील भ्याड हल्ल्याचा काँग्रेसद्वारे निषेध

राहुल गांधी यांच्या काफिल्यावरील भ्याड हल्ल्याचा काँग्रेसद्वारे निषेध

ठळक मुद्देशहर काँग्रेस आक्रमक : इर्विन चौकात पदाधिकाºयांची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या काफिल्यावर गुजरात राज्यात बनासकांडा या गावात शुक्रवारी भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेचा शहर जिल्हा काँग्रेस कमेटीने शनिवारी इर्विन चौकात निषेध केला. यावेळी पदाधिकाºयांनी केंद्र शासनाविरुद्ध निदर्शने केलीत.
गुजरात राज्यात सध्या गुंडागर्दी व माफियाराज सुरू आहे. लोकशाही तत्त्वांची येथे पायमल्ली केली जात असल्याचा आरोप पदाधिकाºयांनी केला. यावेळी शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष किशोर बोरकर, पुष्पा बोंडे, संजय वाघ, युवराज रिठे, शुभम गवाले, भास्कर रिठे, राजीव भेले, निसारभाई मन्सुरी, सुरेश रतावा, रमेश राजोरे, सुरेश धावडे, चंदभागा इंगोले, अभिनंदन पेंढारी, सागर देशमुख, संजय बोबडे, राजेश चव्हाण, राजेश देशमुख, विजय पुनसे, अभय ढोबळे, हमीद शहा, अनिल काजी आदी उपस्थित होते.

Web Title: Congress protests Rahul Gandhi's grave attack