शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समित्या कागदावरच

By admin | Updated: February 26, 2016 00:27 IST

गावातील शांतता, सुव्यवस्था कायम राहून सौदार्याचे वातावरण राहावे व गावातील लहानसहान तंट्याचा गावातच निपटारा.

गावपातळीवरचे चित्र : थेट पोलीस ठाण्यांतच जातात तंटे, गुन्ह्यांचीही होते नोंदअमरावती : गावातील शांतता, सुव्यवस्था कायम राहून सौदार्याचे वातावरण राहावे व गावातील लहानसहान तंट्याचा गावातच निपटारा. होऊन नागरिकांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागू नये म्हणून शासनाने प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या गठित करण्यात आल्या हल्ली अनेक गावात लहानमोठ्या कारणावरुन निर्माण होणाऱ्या वादाच्या तक्रारी गावात न मिटता थेट पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदविला जात असल्याने शासनाच्या मूळ उद्देशालाच बगल दिला जात आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्या कागदावरच अस्तित्वात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. गावपातळीवर सर्व समाज घटकांनी गुण्यागोविंदाने राहावे, आपसातील तंटे, गाव पातळीवरच निपटारा करुन गावात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी व यामधून गावाची एकात्मिता कायम राहून गावाचा विकास साधला जावा, यासाठी शासनव्दारा प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्ती राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गावातील तंटे गावातच मिटवून सर्व धार्मिक उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या गावांना लोकसंख्येनुसार बक्षीस दिले जाते. सुरुवातीला या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट असणारी प्रकरणे सामोपचाराने मिटवून निकाली काढण्यात आली. अनेक गावांना तंटामुक्ती संदर्भात बक्षीस मिळाले. मात्र अलिकडच्या काळात एक दोन वर्षात तंटामुक्त समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडीत गावपातळीवर राजकारण घुसले, सक्षम नेतृत्व मिळाले नाही, पोलिसांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन नाही, यामुळे या समित्या कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याचे दिसून येते. अगदी लहानसहान तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत जात असून गुन्हे नोंदविल्या जात आहे. पोलिसांनाही आर्थिक लाभ होत असल्याने वाद मिटविल्यापेक्षा गुन्हे नोंदविल्या जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अनेक प्रकरणांचे पर्यावरण मोठ्या बखेड्यामध्ये झाल्याची कित्येक उदाहरणे पोलिसांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतल्यास गावपातळीवर हे अभियान यशस्वी होऊ शकते. तसेच भविष्यात वाद निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक तंटामुक्ती समित्यांनीदेखील सक्रीयतेने कार्यान्वित राहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)