शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील आश्रम शाळांवर आयुक्तांच्या धाडी

By admin | Updated: September 29, 2015 01:39 IST

आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया आणखी मजबूत करण्याची गरज असून शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व

अचलपूर : आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया आणखी मजबूत करण्याची गरज असून शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आदिवासी विभाग कटीबध्द आहे. उच्चप्रतिचे शिक्षण देण्यासाठी निवासी अनुदानीत व शासकीय आश्रमशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करुन मोठे व्हा, असा सल्ला राज्याच्या आदिवासी आयुक्त सोनाली पोंक्षे (वायंगणकर) यांनी म्हसोना येथील गुरुदेव आदिवासी अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना सोमवारी दिला. यावेळी त्यांच्या समवेत उपायुक्त एम.जी.गायकवाड, ए.आर.खेतमाळोस, अप्पर आयुक्त आत्राम, सहआयुक्त ए.के.जाधव, प्रकल्प अधिकारी रमेश मवासी आदी उपस्थित होते.म्हसोना आश्रमशाळेत अचानक आदिवासी आयुक्तांच्या गाड्यांचा ताफा धडकताच खळबळ उडाली. विद्यार्थी वर्गात उपस्थित होते. आयुक्तांनी थेट वर्गखोलीत शिरुन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. मात्र, विद्यार्थ्यांना उत्तरे देता आली नाहीत.शिक्षकांची घेतली हजेरी : म्हसोना आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आढळल्यावर आयुक्तांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून घेतले. शिक्षकांचे हजेरी पत्रक स्वत: घेवून प्रत्येक शिक्षकांची हजेरी घेतली. धान्य मोजले : निवासी विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी शासनातर्फे धान्य पुरवठा केला जातो. म्हसोना येथे पहिली ते बारावीपर्यंत वर्ग असून ७४२ विद्यार्थी येथे निवासी आहेत. त्यांना लागणारा धान्यसाठा योग्य आहे किंवा नाही, याची तपासणी त्यांनी स्वत: केली. तर जुन्या गव्हाला सोंडे लागल्याने ते स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या.मेळघाटातील अनुदानित व शासकीय आश्रम शाळांची तपासणी दोन दिवस करणार आहोेत. अनुदानित शाळेला भेट दिल्यावर आमच्या शासकीय शाळांची स्थिती प्रत्यक्ष जाणून घेवून, शासन कुठे कमी पडते, हे जाणून घेतले आहे.- सोनाली पोंक्षे वायगणकर,आदिवासी आयुक्त, नाशिक