शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पोलिसांचे कोम्ब्ािंग आॅपरेशन

By admin | Updated: May 6, 2015 00:25 IST

शहरातील गुन्हेगारीवर अकुंश लावण्यासाठी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी पहाटे ४ ते सकाळी ७...

९७ आरोपी ताब्यात : पहाटे ४ ते ७ वाजेपर्यंत चालली मोहीमअमरावती : शहरातील गुन्हेगारीवर अकुंश लावण्यासाठी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी पहाटे ४ ते सकाळी ७ वाजेपर्यंत दहा पोलीस ठाण्यांतर्गत कोम्बिंग आॅपरेशन चालविले. त्यामध्ये ९७ गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये पाच तडिपार आणि सहा फरार आरोपीचा सहभाग आहे. दरवर्षी उन्हाळयात चोरीच्या घटना वाढत असल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे. त्याअनुषंगाने गुन्हेगारी क्षेत्रावर अकुंश लावण्याकरिता घार्गे यांनी पुढाकार घेतला. मंगळवारी कोम्बिंग आॅपरेशन चालवून १० पोलीस ठाण्यांतर्गत विविध परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांच्या घराची झाडाझडती घेतली. प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांच्या नेत्तृत्वात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, १० पोलीस निरीक्षक, ३५ पोलीस उपनिरीक्षक आणि १०० पोलीस शिपाई तसेच सर्व ठाण्याच्या डिबी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ९७ गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले असून त्यामध्ये कुख्यात गुन्हेगारांचाही समावेश आहे. काही वर्षांपासून फरार असणाऱ्या सहा आरोपींनाही कोम्बिंगमध्ये अटक करण्यात आलीे. याव्यक्तिरिक्त राजापेठ आणि गाडगेनगर ठाण्यांतर्गत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला. कोतवाली ठाण्यांतर्गत परिसरात शेख जावेद आणि सैयद असिम या दोन युवकांना चोरी प्रकरणात अटक करण्यात आले असून त्यांच्याजवळून चोरीतील फावडे व किटकनाशक फवारणीचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच शेख नईम व अफरोज खान या दोन आरोपींना दुचाकी चोरी प्रकरणात अटक करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची चौकशी करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. चौकशीमध्ये आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. शहरात ठिकठिकाणी कोम्बिंग आॅपेरशन चालविल्याने गुन्हेगारी क्षेत्रावर वंचक बसली आहे.