शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता उल्लंघन अजामीनपात्र गुन्हे

By admin | Updated: December 28, 2016 01:42 IST

नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये २८ उमेदवारांना कोणतीही नोटीस न देता अथवा खुलासा न विचारता

ठाण्याचे समजपत्र : न्यायालयाकडून तत्काळ जामीन मंजूर अंजनगाव सुर्जी : नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये २८ उमेदवारांना कोणतीही नोटीस न देता अथवा खुलासा न विचारता त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश विनोद बनसोड यांच्या न्यायालयाने मात्र बहुतांश उमेदवारांना तत्काळ जामीन मंजूर केला. स्थानिक पोलीस स्टेशनने उमेदवारांना समजपत्र देऊन आरोपपत्र दाखल केले होते. काँग्रेसचे उमेदवार गिरीश लोकरे, गुलजारपुरा यांना मात्र रात्रभर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. संपूर्ण प्रकरणात कायद्याचा अवाजवी दुरूपयोग करून व्यक्ती स्वातंत्र्य हिरावण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. सर्वात महत्त्वाचे असे की, गुन्हा दाखल असल्याचे व ठाण्यात जमानत मिळणार नाही, असे तोंडी निरोप देऊन त्यांना बजावण्यात आले. निवडणूक आयोगातर्फे अथवा पोलीस ठाण्यातर्फे कोणतीही नोटीस या संबंधात देण्यात आलेली नाही. पोलीस विभागाच्या आरोपपत्रानुसार असे दिसून येते की, आचारसंहितेचे पालन योग्य रितीने होते की नाही याची पाहणी करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी पथक तयार केले होते. या पथकात पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक गजानन चांभारे, नगर परिषदेचे कर निरीक्षक सागर बोबडे व महसूल विभागाचे मंडळ अधिकारी राजेश मिरगे यांचा समावेश होता. या पथकाने गावातील टेलीफोन/इलेक्ट्रिक खांब व सार्वजनिक जागी लावलेल्या प्रचार फलकांचा पंचनामा करून पोलीस ठाण्याला अहवाल दिला. त्यानुसार भादंविचे कलम १८८ प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाची अवज्ञा होईल, असे कृत्य करणे या जामीनपात्र गुन्ह्यासह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ हे अजामीन पात्र कलम लावण्यात आले. वास्तविक कोणत्याच उमेदवाराने टेलीफोन/इलेक्ट्रिक पोल विद्रुप केला नाही अथवा संबंधित खात्यातर्फेसुद्धा अशी कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. गुन्हे दाखल केल्यानंतर उमेदवारांना पोलीस शिपायांमार्फत निरोप देण्यात आले. साहेबांनी बोलाविले, जमानत होणार नाही, असे सूचक निरोप दिले. मात्र कोणतीही लेखी नोटीस देण्यात आलेली नाही. गिरीश लोकरे या उमेदवाराला तर रात्रभर पोलीस कोठडीत ठेवून त्याच्यावर एल. सी. बी. कोर्ट अमरावती येथेसुद्धा कार्यवाही करण्यात आली. जामीनपात्र गुन्ह्यात अजामीनपात्र गुन्ह्याचे कलम वापरून पोलीस ठाण्यातर्फे कायद्याचा अवाजवी वापर केल्याचा आरोप अनेक उमेदवारांनी केला आहे. ज्या उमेदवारांनी ठाणेदार पाटील यांना याबाबत विचारणा केली त्यांना ठाणेदार पाटील यांनी अपमानास्पद वागणूक देऊन पोलीस कोठडीत टाकण्याची धमकीसुद्धा दिली आहे. (तालुका प्रतिनिधी) कायद्यानुसार कार्यवाही केली : सुधीर पाटील सदर प्रकरणात आचारसंहिता देखरेख पथकाने दिलेल्या अहवालानुसार कायदेशीर कार्यवाही केली आहे. पोलीस ठाण्याची कोणतीही भूमिका नाही. संपूर्ण प्रकरण निवडणूक आयोगाने तयार केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनानुसार कार्यवाही करण्यात आल्याचे सुधीर पाटील म्हणाले.