नरखेड-काचीगुडा पॅसेंजर मोर्शीच्या क्रॉसिंगवर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST2021-03-04T04:23:40+5:302021-03-04T04:23:40+5:30

साडेचार तास खो‌ळंबा, नागपूर-परतवाडा मार्गावर वाहनांच्या रांगा मोर्शी : नरखेड येथून पहाटे निघणारी काचीगुडा पॅसेंजर रेल्वेचे इंजीन मोर्शी-चांदूर ...

Closed at Narkhed-Kachiguda Passenger Morshi Crossing | नरखेड-काचीगुडा पॅसेंजर मोर्शीच्या क्रॉसिंगवर बंद

नरखेड-काचीगुडा पॅसेंजर मोर्शीच्या क्रॉसिंगवर बंद

साडेचार तास खो‌ळंबा, नागपूर-परतवाडा मार्गावर वाहनांच्या रांगा

मोर्शी : नरखेड येथून पहाटे निघणारी काचीगुडा पॅसेंजर रेल्वेचे इंजीन मोर्शी-चांदूर बाजार रस्त्याच्या क्रॉसिंगवर बंद झाल्याने सुमारे पाच तास हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसह वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागला.

रेल्वे गाडी क्रमांक ०७६४२ ही नरखेड येथून पहाटे काचीगुडा येथे जाण्यासाठी दररोज निघते. मोर्शी रेल्वे स्थानकानजीक चांदूर बाजार मार्गावरील रेल्वे गेटजवळ नरखेड-काचीगुडा पॅसेंजर २१८७२ क्रमांकाच्या क्रॉसिंगजवळ रेल्वे इंजीनमध्ये बिघाड झाल्यामुळे बुधवारी सकाळी सव्वा पाचपासून रेल्वे गेटच्या थांबली. यामुळे मोर्शीहून नागपूर व चांदूर बाजार, परतवाडाकडे जाणाऱ्या वाहनांच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. अमरावती, हिंगोली, वाशिम, अकोला, हैदराबादकडे आरक्षित तिकिटाने जाणाऱ्या प्रवाशांनाही तीन तास अडकून पडावे लागले. सकाळी १० च्या सुमारास वरूड रेल्वे स्थानकावर मालगाडी थांबवून त्याच्या इंजीनने पॅसेंजर मोर्शी स्थानकावर आणण्यात आले. तेथून पुढे ती रवाना करण्यात आली. लग्नतिथी दाट असल्याने ही गाडी पूर्ण क्षमतेने धावत आहे.

---------

Web Title: Closed at Narkhed-Kachiguda Passenger Morshi Crossing