शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता १२ वीची पुरवणी परीक्षा ९ जुलैपासून

By admin | Updated: May 26, 2016 01:17 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातंर्गत उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची परीक्षा ९ जुलैपासून घेतली जाणार आहे.

शिक्षण मंडळाचा निर्णय : संजय यादगिरे यांची माहितीअमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातंर्गत उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची परीक्षा ९ जुलैपासून घेतली जाणार आहे. त्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना ४३ दिवसांनंतर पुन्हा परीक्षेला सामोरे जावे तर लागणार आहेच; मात्र शैक्षणिक वर्षही वाया जाणार नाही. इयत्ता १० आणि १२ वीची परीक्षा सोबत सुरु होणार असल्याचे शिक्षण मंडळाचे सचिव संजय यादगिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.यावर्षी इयत्ता १२ वीत अमरावती जिल्ह्यातील ३८१ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३५२३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५१७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३०२६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे ९ जुलैपासून सुरू होणाऱ्या १२ वीच्या पुरवणी परीक्षेकरिता ४९१४ एवढ्या विद्यार्थ्यांना तयारी करावी लागणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज जून महिन्यातच महाविद्यालयात सादर क रावा लागणार आहे. गतवर्षी इयत्ता १० वीचा निकाल लागल्यानंतर नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, यासाठी लगेच परीक्षेचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इयत्ता १० वीची परीक्षा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्रात पुढील वर्गात प्रवेश घेता आला. आता हाच प्रयोग इयत्ता १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आला असून ९ जुलैपासून परीक्षा सुरू होणार आहे. जुलै महिन्यात परीक्षा आटोपून आॅगस्टमध्ये निकाल लावण्याची तयारी शिक्षण मंडळाने दर्शविली आहे. परीक्षेनंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता निकाल लागताच प्रवेश मिळणार असल्याने हा निर्णय विद्यार्थ्यासाठी लाभदायक ठरणारा असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)