अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलींचे साडेतीनशे व्हिडीओ काढल्याचा दावा, तरुण गजाआड, व्हिडीओ-चित्र सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:54 IST2026-04-15T09:52:44+5:302026-04-15T09:54:31+5:30

Amravati Crime News: अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या परतवाड्यातील तरुणाला अखेर सोमवारी रात्री  पोलिसांनी अटक केली. अयान अहमद तनवीर अहमद (वय १९, रा. परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे.

Claims to have filmed 350 videos of minor girls in Amravati, youths are furious, video-pictures go viral on social media | अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलींचे साडेतीनशे व्हिडीओ काढल्याचा दावा, तरुण गजाआड, व्हिडीओ-चित्र सोशल मीडियावर व्हायरल

अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलींचे साडेतीनशे व्हिडीओ काढल्याचा दावा, तरुण गजाआड, व्हिडीओ-चित्र सोशल मीडियावर व्हायरल

परतवाडा (अमरावती) - अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या परतवाड्यातील तरुणाला अखेर सोमवारी रात्री  पोलिसांनी अटक केली. अयान अहमद तनवीर अहमद (वय १९, रा. परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  मुख्यमंत्र्यांकडून दखल
याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन अमरावती जिल्हा पोलिस अधीक्षकांना कुठलीही हयगय न करता कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

पालकमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे निर्देश 
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेत अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांशी तात्काळ संपर्क साधला. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती मिळू शकते.

मुलींशी अश्लील वर्तन
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुमारे सहा ते आठ व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले होते. त्यात आरोपी तरुण वेगवेगळ्या मुलींशी अश्लील वर्तन करताना दिसून आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून खा.डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण तायडे यांनी सोमवारी दुपारी भाजप शिष्टमंडळासह पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली.
यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी 
अयान याला अटक केली. यादरम्यान, आ. प्रवीण तायडे यांनी अयानने सुमारे दीडशे मुलींशी जवळीक साधून तब्बल साडेतीनशे व्हिडिओ तयार केल्याचा आरोप करीत त्याची सत्यता तपासण्याची मागणी पोलिसांकडे केली. परतवाड्याचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास 
होत आहे.

Web Title : अमरावती: नाबालिगों के अश्लील वीडियो वायरल, आरोपी गिरफ्तार, राजनीतिक हस्तक्षेप

Web Summary : अमरावती के परतवाड़ा में एक युवक को नाबालिग लड़कियों के अश्लील वीडियो प्रसारित करने के आरोप में गिरफ्तार किया गया। मुख्यमंत्री और पालक मंत्री के सख्त कार्रवाई के निर्देशों सहित राजनीतिक हस्तक्षेप के बाद पुलिस ने कार्रवाई की। 350 वीडियो की संभावना की जांच जारी है।

Web Title : Amravati: Teen's Obscene Videos Spark Arrest, Political Action Ensues

Web Summary : A youth in Paratwada, Amravati, was arrested for circulating obscene videos of minor girls. Police acted after political intervention, including directives from the Chief Minister and Guardian Minister, demanding strict action. Investigation ongoing into potential of 350 videos.