शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दीपाली आत्महत्याप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली राज्यपालांंची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST

कॅप्शन - दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्यपालांशी चर्चा करताना चित्रा वाघ. -------------------------------------------------------------------------------- एम.एस. रेड्डी याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवा, जिल्हा ग्रामीण ...

कॅप्शन - दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्यपालांशी चर्चा करताना चित्रा वाघ.

--------------------------------------------------------------------------------

एम.एस. रेड्डी याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवा, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भूमिका संदिग्ध

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाला द्यावे, अशी त्यांनी मागणी केली.

चित्रा वाघ यांनी ५ एप्रिल रोजी राज्यपालांची भेट घेतली. दीपाली आत्महत्याप्रकरणी आतापर्यंत झालेला घटनाक्रम त्यांच्यासमोर ठेवला. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक़ विनाेद शिवकुमार याचे निलंबन झाले असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. दीपाली चव्हाण गर्भवती असताना जाणूनबुजून त्यांना त्रास देण्यात आला, ज्यात गर्भपात झाला. यामुळे त्यांना दोन दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्या दिवसाचे वेतन कापण्यात आले. सहा, सात महिन्यांचा पगार थांबवून दीपाली चव्हाण यांची आर्थिक काेंडी करण्यात आली. वेळोवेळी अपमानित करण्यात आले. दीपाली यांना झालेल्या त्रासाची वेळोवेळी कल्पना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना दिलेली होती, पण त्यांनी दुर्लक्ष केले. रेड्डी यांनी वेळीच लक्ष दिले असते, तर कदाचित दीपाली आज आपल्यामध्ये असत्या, असे वाघ म्हणाल्या. त्यामुळे रेड्डी याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली.

----------------

पोलीस अधीक्षकांची भूमिका संदिग्ध

याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांची भूमिका संदिग्ध आहे. एवढेच नव्हे तर आरएफओ संघटनेचे तसे म्हणणे आहे. त्यामळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी हा तपास अमरावती एसपीकडून काढून घेण्यात यावा तसेच एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्यांकडे तपास सोपवावा, अशा मागणीचे निवेदन राज्यपाल कोश्यारी यांना चित्रा वाघ यांनी दिले.