शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चेकपोस्टवर वाहतूक पोलिसाला उडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

पोलीस सूत्रानुसार, तिवसा पोलीस ठाण्याच्या अमरावती व वर्धा जिल्हाच्या सीमेवर आचारसंहिता तपासणी नाका उभारण्यात आला आहे येथे वर्धा जिल्हातून अमरावती जिल्हात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. त्यानुसार नागपूर येथून अमरावतीकडे जाणाºया एमएच ३० एझेड २३२२ या चारचाकी वाहनाला तपासणीसाठी पोलिसांनी थांबविले.

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी करताना वाहतूक पोलिसाला जिवे मारण्याच्या उद्देशाने एका चारचाकी वाहनाने जखमी करून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिवसा पोलिसांनी पळ काढणाऱ्या वाहन चालकाला पकडले. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहेपोलीस सूत्रानुसार, तिवसा पोलीस ठाण्याच्या अमरावती व वर्धा जिल्हाच्या सीमेवर आचारसंहिता तपासणी नाका उभारण्यात आला आहे येथे वर्धा जिल्हातून अमरावती जिल्हात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. त्यानुसार नागपूर येथून अमरावतीकडे जाणाºया एमएच ३० एझेड २३२२ या चारचाकी वाहनाला तपासणीसाठी पोलिसांनी थांबविले. मात्र वाहनचालकाने पोलिसांशी वाद घालत थेट कर्तव्यावर असलेल्या सतीश अशोकराव चंदन (४४) या वाहतूक पोलिसाच्या अंगावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सुदैवाने बचावले. या घटनेत वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून तिवसा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी वाहनचालक विजय विश्वनाथ देवके (४४, रा.अकोला) याला तिवसा पोलिसांनी अटक करून त्याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, या घटनेमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहेनाकाबंदी करून पकडले वाहनचालकालाघटनास्थळावरून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन चारचाकी वाहन चालकाने पळ काढला होता. मात्र, तिवसा पोलिसांनी तातडीने पेट्रोल पंप चौकात नाकाबंदी करून वाहनासह चालकाला अटक केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली होती.

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी