१५३ महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांना वेतन नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 07:29 PM2019-07-26T19:29:37+5:302019-07-26T19:30:59+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांतील ४८३ पैकी १५३ महाविद्यालयांतील तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांना वर्षभरापासून मानधन मिळाले नाही.

CHB professors at 4 colleges have no salary | १५३ महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांना वेतन नाही

१५३ महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांना वेतन नाही

Next

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांतील ४८३ पैकी १५३ महाविद्यालयांतील तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांना वर्षभरापासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाची मोठी समस्या उभी ठाकली आहे. शासनाने नोव्हेंबर २०१८ मध्ये शासनादेश काढूनदेखील सीएचबी प्राध्यापकांना वेतन मिळाले नाही. 

अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ आणि अमरावती या पाचही जिल्ह्यांत सन २०१८-२०१९ या वर्षात सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्राध्यापकांची नियुक्ती करताना संबंधित अधिकाऱ्यांची संमती घेण्यात आली. यापैकी काही महाविद्यालयांतील प्राध्यापकांना अर्ध्या सत्राचे मानधन देण्यात आले, तर काहींना अद्यापही मिळाले नाही. या गंभीर प्रकाराकडे उच्च व शिक्षण विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. 

नोव्हेंबर २०१८ मध्ये शासननिर्णयात शालार्थ पोषण आहार आणि सीएचबी प्राध्यापकांना नियमित मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. असे असताना प्रशासन सीएचबी प्राध्यापकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असताना, सीएचबी प्राध्यापकांना मानधन केव्हा मिळणार, असा सवाल अन्यायग्रस्त प्राध्यापकांनी उपस्थित केला आहे.

उपासमारीची वेळ

१५३ महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांना मानधन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. उच्चशिक्षण घेऊनही सीएचबी प्राध्यापकांना तोकड्या मानधनावर विद्यादानाने काम करावे लागते,  अध्यापनाच्या समान स्तरावर असलेल्या नियमित प्राध्यापकांना भरमसाठ वेतन मिळते. शासनादेशानुसार प्रति तासिका ५०० रुपये सीएचबी प्राध्यापकांना दिले जाणार आहेत. मात्र, प्रशासकीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही केली जात नाही, अशी ओरड आहे.

‘त्या’ प्राध्यापकांना वेतन नाही?

बिंदू नामावली डावलून गरजेनुसार सीएचबी प्राध्यापकांना नियुक्ती देण्यात आली. मात्र, या नियुक्तीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मान्यता नाकारली आहे. संस्थाचालक आणि महाविद्यालयांच्या चुकीचा फटका सीएचबी प्राध्यापकांना भोगावा लागणार आहे. अशा प्राध्यापकांना वेतन मिळणार नसल्याची माहिती आहे.

१५३ महाविद्यालयांतील सीएचबी प्राध्यापकांचे मानधन मिळाले नाही, हे वास्तव आहे. मात्र, या प्राध्यापकांच्या मानधनाची फाइल शासनदरबारी प्रलंबित आहे. मानधनाची रक्कम येताच ती त्वरित प्राध्यापकांना दिली जाईल.

 - संजय जगताप, सहसंचालक, उच्च व शिक्षण अमरावती.

Web Title: CHB professors at 4 colleges have no salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.