शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
7
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
8
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
9
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
10
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
11
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
12
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
13
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
14
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
15
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
16
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
17
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

खरवाडी मार्गावर चक्काजाम

By admin | Updated: June 10, 2014 23:47 IST

तालुक्यात १६ तासांचे भारनियमन सुरू आहे. कडक उन्हात नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यात जीवाची काहिली होत असताना गावात कृत्रिम पाणी टंचाई व शेती पिकावरही याचा परिणाम होत आहे.

विद्युत विभागाविरूद्ध संताप : १६ तास भारनियमनाला नागरिक कंटाळले
चांदूरबाजार : तालुक्यात १६ तासांचे भारनियमन सुरू आहे. कडक उन्हात नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यात जीवाची काहिली होत असताना गावात कृत्रिम पाणी टंचाई व शेती पिकावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जि. प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात खरवाडी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
स्थानिक वीज मंडळाच्या अख्त्यारीत येणाऱ्या कुरळपूर्णा, तळवेल, बेलोरा या फीडरवरील सिंगल फेजचा विद्युत पुरवठा असलेल्या गावामध्ये भारनियमनचे प्रमाण मर्यादेच्या पलिकडे गेले आहे. याबाबत सदर फिडरवरील गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वारंवार लेखी तक्रारी केल्या. त्यांच्या या लेखी तक्रारीचा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर कोणताही परिणाम झाला नाही.
या अनियमित भारनियमाविरोधात सदर गावातील नागरिकांचा विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात रोष खदखदत होता. सततचे भारनियमन बंद करून गावठाण फिडरची सुविधा सुरू करण्याबाबत सतत पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहाराला विद्युत वितरण कंपनीने नेहमीच केराची टोपली दाखविली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन चक्काजाम आंदोलनाचा पवित्रा घेतला. नियमानुसार सिंगल फेज फिडरमध्ये गावातील विद्युत पुरवठा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. परंतु या सिंगल फेजच्या नावावर ग्रामीण भागात १६ तासाचे भारनियमन लादले जात आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा ठाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडुपंत ठाकरे, प्रवीण भुजाडे, निखील ठाकरे, अनिस अहमद, दिलीप अंभोरे, दिलीप मेश्राम, संजय बावनथडे, बाळासाहेब विधळे, राजेश अढाव, रवींद्र काळे, निखिल बोंडे, प्रभाकर लेंडे, दिनेश बंड, गजानन देशमुख, राजेश वानखडे यांच्यासह ५०० ते ६०० कार्यकर्ते व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. या चक्काजाम आंदोलनाचा भडका उडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक डि. बी. तळवी, सहायक पोलीस निरीक्षक लवंगे, पोलीस उपनिरीक्षक मयूर तेलंग, सैयद अजमत, मनोज गायकी, संतोष अढाऊ, राजू हिरुळकर यांच्यासह मोठा पोलीस ताफा उपस्थित होता.
यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा अकस्मात अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभिर्य ओळखून रस्त्यावर बसून शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली व चक्काजाम आंदोलनाची सांगता झाली.