थंडीमुळे प्राथमिक,माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल

By Admin | Updated: December 20, 2014 00:06 IST2014-12-20T00:06:24+5:302014-12-20T00:06:24+5:30

सध्या शहर व जिल्ह्यात थंडीचा प्रकोप वाढला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात भरणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

Changes in primary, secondary school time due to cold | थंडीमुळे प्राथमिक,माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल

थंडीमुळे प्राथमिक,माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल

अमरावती : सध्या शहर व जिल्ह्यात थंडीचा प्रकोप वाढला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात भरणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
कडाक्याची थंडी लक्षात घेता सकाळच्या शाळांची वेळ बदलण्याची मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी शुक्रवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांचेकडे निवेदनाव्दारे केली होती. या मागणीची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. सकाळच्या सत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळी ८.३० वाजता भरतील. याबाबतचे आदेशही शाळांना रवाना करण्यात आले आहेत. सध्या थंडीची लाट पसरली आहे. यामुळे विद्यार्थी हैराण होत आहेत. आजारही बळावत आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांकडे पुरेशी थंडीपासून संरक्षणाची सोय नसल्याने थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शाळेची वेळ बदलविण्याचा पर्याय योग्य असल्याचे मत शिवसैनिकांनी निवनेदनातून व्यक्त केले होते.
अन्यथा शाळांना कुलूप ठोकणार
मुलांना विद्यार्थ्या सोबतच पालकांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे . त्यासोबतच अनेक शिक्षक ग्रामीण भागात किंवा शहरी भागात सेवा देतात त्यांनाही शाळेत जाताना थंडीचा सामना करावा लागत आहे . ही सर्व बाब लक्षात घेता शिक्षण विभागाने शाळाच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी शिक्षणाधिकारी यांचे कडे लावून धरली. दरम्यान शिक्षणाधिकारी यांनी थंडीची लाट कायम असेपर्यत प्रायमरी व प्राथमिक शाळांचे वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सकाळच्या सत्रातील शाळा सकाळी ८. ३० वाजता भरविण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आंदोलनाने शाळांची वेळ बदलली असल्यामुळे विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला आहे निवेदन देतेवेळी अमोल निस्ताने, मोहन क्षीरसागर, रामदास ढगे, संजय बुंदिले, अकुंर डवरे, बाबाराव वैध, निजाम सरकारल छोटू इंगोले, शैलेद्र डहाके, अतुल सोनकुसरे, विशाल जाधव, पीटू चावरे रवि काळबांडे, उमेश गोगटे आदी उपस्थित होते.

Web Title: Changes in primary, secondary school time due to cold