शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल, पालक संभ्रमात

By admin | Updated: July 4, 2015 00:47 IST

विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून २०१५-१६ काही अभ्यासक्रमातच बदल झाला आहे.

पुस्तकांचे दोन भागात विभाजन : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नवा प्रयोग
अमरावती : विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून २०१५-१६ काही अभ्यासक्रमातच बदल झाला आहे. त्यानुसार पाचवीच्या चार विषयांना परिसर अभ्यासक्रमात दोन भाग सामावून घेतले असून, सेमी इंग्रजी माध्यमातील विज्ञान विषय मराठीतून शिकविले जाणार आहे. त्यामुळे पालकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ नुसार शिक्षण विभागातर्फे अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून एनसीआरटीईच्या शैक्षणिक प्राधिकरणाकडून आलेल्या मार्गदर्शनानुसार विषयांचा समतोल राखण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार अभ्यासक्रमातील बदल दोन वर्षांपासून करणे सुरु झाले आहे.
पालकांत संभ्रम
यंदापासून बदललेल्या पाचवीच्या अभ्यासक्रमात सेमी इंग्रजी माध्यमातील विज्ञान विषय मराठीतून शिकविला जाणार आहे. दहावीनंतर गणित व विज्ञान हे विषय संपूर्णपणे इंग्रजीतून असल्याने ते सेमी इंग्रजी माध्यमातून व्हावेत, असा पालकांचा आग्रह असताना विज्ञान विषय मराठीतून देण्यात आल्याने पालक संभ्रमात आहेत. शाळांमध्ये प्रवेशासाठी गेल्यानंतर हा गोंधळ उडत आहे. मात्र सहावीत सामान्य विज्ञान हा विषय स्वतंत्र राहणार असल्याने शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

पहिली, दुसरीचा परिसर अभ्यासक्रम बंद
शिक्षण विभागाचा सुधारित विषय रचनेनुसार प्राथमिक स्तरातील पहिली व दुसरीसाठी भाषा व गणित हे विषय ठेवले आहेत. मात्र या दोन्ही वर्गांसाठी परिसर अभ्यास हा स्वतंत्र विषय ठेवलेला नाही. भाषा व गणित या विषयामध्येच परिसर अभ्यासाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय इंग्रजी विषय अनिवार्य असेल आणि शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, कार्यानुभव हे विषयही अंतर्भूत राहणार आहेत.

पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सन २०१५-१६ पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल केला गेला आहे. त्यानुसार पाचवीसाठी पूर्वीचे सामान्य विज्ञान, नागरिकशास्त्र व भूगोल या विषयाची एकत्रित परिसर अभ्यास भाग-१ मध्ये एकाच रितीने मांडणी केलेली आहे. इतिहास व भूगोल हे विषय भाग-२ मध्ये एकत्रित केले आहेत. अर्थात पाच विषयांच्या पुस्तकांतील अभ्यासक्रम परिसर अभ्यासक्रम या विषयाच्या दोन टप्प्यांत सामावून घेतल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे निश्चितच कमी झाले आहे. त्यामुळे या निर्णयाचे पालकांकडून स्वागत होत आहे.

पाचवीसाठी पूर्वीचा अभ्यासक्रम
पाचवीच्या अभ्यासक्रमात यापूर्वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, कार्यानुभव, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण विषय होते.

नवीन अभ्यासक्रम
पाचवीच्या अभ्यासक्रमात यंदा झालेल्या बदलानंतर मराठी प्रथम, हिंदी व्दितीय, इंग्रजी तृतीय प्रथम हे विषय आणि त्याचबरोबर परिसर अभ्यास भाग -१, व २ गणित, कार्यानुभव, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण हे विषय समाविष्ट आहेत.

पाचवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सेमी इंग्रजी माध्यमासाठी परिसर अभ्यास भाग १ मधील सामान्य विज्ञान हा विषय इंग्रजीत तसेच भूगोल व नागरिकशास्त्र हे विषय मराठीतून शिकविणार आहेत.
- शरद तिरमारे, मुख्याध्यापक.

प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ नुसार यंदा पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र हे विषय परिसर अभ्यासक्रम १ व २ मध्ये सामावून घेतले आहेत. यानुसार पुढील वर्षी सहावीच्या अभ्यासक्रमात बदल हाईल.
- पंडित पंडासने, उपजिल्हाधिकारी, प्राथमिक.