शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यांनंतर शाळेच्या फळ्यावर खडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST

तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी ८० टक्के उपस्थिती, शिक्षकांकडून विशेष काळजी तिवसा : पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ...

तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी ८० टक्के उपस्थिती, शिक्षकांकडून विशेष काळजी

तिवसा : पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी कोरोनाकाळात पहिल्यांदा बुधवारी शाळा उघडल्या तेव्हा त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांनी ८० टक्के उपस्थिती दर्शविली. यावेळी शिक्षकांनी सॅनिटाईजर, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर बाबी पाळून मुलांचे शाळेत जंगी स्वागत केले.

तिवसा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचेसुद्धा गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शाळा सुरू होण्यापूर्वी काळजी म्हणून सर्व वर्गखोल्या, शाळा परिसरात जंतुनाशक फवारणी केल्या आहेत. प्रत्येक शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतिपत्र घेण्यात आले. पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. तिवसा पंचायत समिती सभापती शिल्पा रवींद्र हांडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी शाळा केंद्रप्रमुख दलवीर व्यास, मुख्याध्यापिका हर्षा बांबल, पुष्पा पाटणे, छाया देशमुख, चंद्रकांत मानहोर, कृष्णा चिचमलकर, श्रीकृष्ण कोंडाणे, मंदा घुगुसकर, संध्या पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.

---------------------------------------

पहिल्या दिवशी मुलांची ८० टक्के उपस्थित..

तिवसा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ७४ शाळा सुरू झाल्या. या सर्व शाळांमध्ये लहान मुलांची विशेष काळजी घेत, विविध व्यवस्था त्याप्रमाणे करण्यात आली. तर तिवसा पूर्व माध्यमिक मुलांच्या शाळेत विविध फुलांनी सजावट रांगोळी काढण्यात आली. मुलांना व पालकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले.

----------------------------------