शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेची भंगार विक्रीतून विक्रमी 'कमाई'; ४५९ कोटींचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:37 IST

Amravati : रेल्वे प्रशासनाने जुन्या साहित्याची विल्हेवाट लावत उत्पन्नाचा नवा उच्चांक गाठला आहे. मध्य रेल्वेने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून तब्बल ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.

अमरावती : रेल्वे प्रशासनाने जुन्या साहित्याची विल्हेवाट लावत उत्पन्नाचा नवा उच्चांक गाठला आहे. मध्य रेल्वेने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून तब्बल ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. विशेष म्हणजे, रेल्वे बोर्डाने दिलेले ४५० कोटींचे उद्दिष्ट ओलांडत मध्य रेल्वेने गेल्या दोन वर्षांतील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

रेल्वेच्या विविध विभागांत पडून असलेले निकामी रूळ, लोखंडी सांगाडे, जुने डबे आणि तांत्रिक साहित्य यांची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली. २०२३-२४ या आर्थिक वर्षानंतरची ही सर्वात मोठी कमाई ठरली आहे. यामुळे रेल्वेच्या आवारातील कचरा आणि भंगाराची विल्हेवाट तर लागलीच, पण तिजोरीतही मोठी भर पडली आहे. 'शून्य भंगार' मोहिमेला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.

मध्य रेल्वेच्या भांडार विभागाने कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप (नाशिक), परळ वर्कशॉप आणि मनमाड वर्कशॉप यांसारख्या दुर्गम व विखुरलेल्या ठिकाणांसह, मध्य रेल्वेच्या सर्व पाचही विभागांमध्ये पडून असलेला भंगार माल शोधून काढण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यंत सखोल व सुसूत्र मोहिमा हाती घेतल्या आहेत. या केंद्रित प्रयत्नांमुळे विक्री कामगिरीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

भुसावळ विभाग हा सर्वाधिक कामगिरी करणारा विभाग म्हणून समोर आला असून, त्याने १०५.३९ कोटी रुपयांच्या भंगार विक्रीची विक्रमी नोंद केली आहे; त्यानंतर माटुंगा कार्यशाळा (६८.३९ कोटी रुपये), नागपूर विभाग (६४.०२ कोटी रुपये), मुंबई विभाग (५५.४९ कोटी रुपये), पुणे विभाग (५० कोटी रुपये) आणि उर्वरित रक्कमेत इतर विभाग व उत्पादन घटकांचा वाटा आहे.

ठळक मुद्दे:

  • एकूण महसूल: ४५९.५२ कोटी रुपये.
  • लक्ष्य: ४५० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण.
  • विक्रमी कामगिरी: गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक उत्पन्न.
  • फायदा: रेल्वे परिसर स्वच्छ झाला आणि आर्थिक उत्पन्नात वाढ.


यामध्ये या बाबींचा समावेश आहे

  • रेल्वे रूळ भंगार : ४७,५०२ मेट्रिक टन
  • लोह-धातू भंगार : ३१,२९८ मेट्रिक टन
  • लोह व्यतिरिक्त-धातू भंगार : ३,६१६ मेट्रिक टन
  • स्लीपर्स : २,६५,६२५ नग
  • रोलिंग स्टॉक : ५० लोकोमोटिव्ह्ज, ७८ डबे आणि १३७ वॅगन्स
English
हिंदी सारांश
Web Title : Central Railway's scrap sale generates record revenue of ₹459 crores.

Web Summary : Central Railway earns ₹459.52 crore from scrap sales, exceeding its target. The revenue came from selling discarded rails, coaches, and other materials. Bhusawal division led with ₹105.39 crore in sales. This initiative cleared railway premises and boosted revenue.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेAmravatiअमरावती