शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

By admin | Updated: December 11, 2014 22:59 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित शिवाजी शिक्षण महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद, बंगलोर येथील नॅक कमेटीने १० व ११ आॅक्टोबर २०१४ रोजी महाविद्यायास भेट

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित शिवाजी शिक्षण महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद, बंगलोर येथील नॅक कमेटीने १० व ११ आॅक्टोबर २०१४ रोजी महाविद्यायास भेट देऊन महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. या मूल्यांकनात महाविद्यालयास सीजीपीए ३.५३ व ‘अ) श्रेणी देऊन मानांकित केले आहे. यापूर्वी श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय यास बी प्लसने मानांकित केले होते, हे विशेष.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत असलेल्या सर्व संलग्नित महाविद्यालयांपैकी शिवाजी शिक्षण महाविद्यालयास सर्वाधिक ३.५३ गुणांकन मिळालेले आहे. तसेच शिवाजी शिक्षण संस्थेंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयातून देखील या महाविद्यालयास सर्वाधिक सी. जी. पी. ए. गुण प्राप्त झाले.
राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्विकृती परिषद (नॅक) च्या समितीत देबजानी सेनगुप्ता कोलकत्ता (अध्यक्ष), पी. के. गुप्ता शिलाँग (समन्वयक) तर के. आर. जयदेव आप्पा बंगलोर हे समितीचे सदस्य म्हणून महाविद्यालयात दाखल झाले होते. या चमूने अभ्यासक्रम विकसन, अभ्यासक्रमाचे विविध पैलू, अध्यायन, अध्यापन आणि मूल्यमापन, संशोधन, सल्ला आणि विस्तार, पायाभूत अध्ययन सामूग्री व पायाभूत सुविधा, विद्यार्थी सेवा व विकास, प्रशासन व नेतृत्व (नवोपक्रम) नाविन्यपूर्ण अभ्यास या सर्व बाबींची बारकाईने तपासणी करून ३.५३ सी. जी. पी. ए. दिले जे संत गाडगेबाबा विद्यापीठात तसेच विदर्भ स्तरावर सर्वाधिक आहे. या भेटीदरम्यान नॅक चमूने विद्यार्थी, पालक तसेच माजी विद्यार्थी व शिवाजी शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन यांचेशी संवाद साधून त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करून घेतले. सोबतच शिक्षण व शारीरिक शिक्षण विभागातील सर्व सुविधांची पाहणी केली.
महाविद्यालयात नॅक येण्यापूर्वी शिवाजी शिक्षण संस्थेने नेमलेली संस्था मूल्यांकन व अधिस्विकृती परिषदेने भेट दिली. भेटीदरम्यान संस्थेचे अध्यक्ष अरूण शेळके, उच्च शिक्षण संचालक व्ही. एस. जामोदे, प्राचार्य वि. गो. ठाकरे, निर्मला वानखडे यांच्या समितीने भेट देऊन महाविद्यालयात विविध विभागांची तपासणी केली. या समितीने मार्गदर्शन केल्यानेच नॅक समितीला महाविद्यालय संपूर्ण आत्मविश्वासाने सामोरे गेले. या यशात प्राचार्य मीना रोकडे, समन्वयक वनिता काळे, संजय खडसे, किशोर क्षत्रिय, अंजली ठाकरे, अमित गावंडे, संगीता बिहाडे, ग्रंथपाल वंदना खाकरे, शिक्षकेत्तर कर्मचारी नरेश माहुरे, नीलेश ठाकरे, रवींद्र जोजारे, अमोल देशमुख, प्रकाश अवझाड, धिरज देशमुख, संजय बोबडे, सागर महिंगे, ज्ञानेश्वर ठाकरेसह बी.एड.चे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.